पीयूष गोयल यांच्या मुंबईतील घरी चोरी, महत्त्वाची माहिती लीक झाल्याचा संशय!

पीयूष गोयल यांच्या मुंबईतील घरी चोरी, महत्त्वाची माहिती लीक झाल्याचा संशय!

बुधवारी संध्याकाळी मुंबई पोलिसांनी एका नोकराला दिल्लीतून ताब्यात घेतलं आहे. विष्णू कुमार वर्मा असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 03 ऑक्टोबर : केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांच्या मुंबईत असलेल्या घरात चोरी झाली होती. या आरोपींना आरोपीला पोलिसांनी दिल्लीतून अटक केली आहे. त्यांचे घर मुंबईतील नेप्येंसी रोडवर आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरात काम करणा करणाऱ्या नोकरांपैकी एकाने 15 किंवा 16 सप्टेंबर रोजी चोरी घरात चोरी केली होती.

बुधवारी संध्याकाळी मुंबई पोलिसांनी एका नोकराला दिल्लीतून ताब्यात घेतलं आहे. विष्णू कुमार वर्मा असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. आरोपीकडून पोलिसांना काही पैसे आणि हार्ड डिस्क सापडली आहे. पोलिसांना असा संशय आहे की आरोपीने त्याच्या फोनद्वारे कोणालाचरी महत्वाची माहिती पाठविली आहे, ज्याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी नोकर गेल्या 3 वर्षांपासून केंद्रीय मंत्र्यांच्या घरात कार्यरत होता. सध्या आरोपीचा फोन सायबर सेलकडे तपासासाठी पाठविण्यात आला आहे. तर आरोपीने डिलीट केलेले मेल पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. याशिवाय आरोपींच्या साथीदारांचा शोधही घेण्यात येत आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: October 3, 2019, 10:20 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading