असा असेल मराठा क्रांती मोर्चाचा मार्ग

असा असेल मराठा क्रांती मोर्चाचा मार्ग

ईस्टन , वेस्टर्न आणि हर्बर मार्ग ही रेल्वे सेवा, आणि महामार्ग येथून जिजामाता उद्यानला कसे पोहोचाल याबाबत मराठा क्रांती मोर्चा आणि पोलिसांनी तयारी केलीय.

  • Share this:

 प्रफुल्ल साळुंखे, मुंबई, 08 आॅगस्ट :  मुंबईत 9 ऑगस्ट रोजी मराठा क्रांती मोर्चा निघणार आहे. या मोर्चासाठी राज्यभरातून लाखो मराठा बांधव मुंबईतील भायखळा राणीच्या बागेत एकत्र येऊन आझाद मैदानाकडे मोर्चा नेणार आहेत. अनेक मराठा बांधव आपापल्या वाहनाने मुंबईत येतील. भायखळ्याला जवळ असलेल्या बीपीटी गाडी अड्डा इथे हजारो वाहनांची पार्किंग व्यवस्था मराठा क्रांती मोर्चा आणि पोलिसांच्या वतीने करण्यात आली आहे. ईस्टन , वेस्टर्न आणि हर्बर मार्ग ही रेल्वे सेवा, आणि महामार्ग येथून जिजामाता उद्यानला कसे पोहोचाल याबाबत मराठा क्रांती मोर्चा आणि पोलिसांनी तयारी केलीय.

कोल्हापूर सांगली येथून येणारी वाहन एपीएमसी मसाला मार्केट वाशी येथे थांबवता येतील.सातारा येथून येणाऱ्या गाड्या एपीएमसी कांदा बटाटा मार्केट वाशी येथे लावता येतील. त्याच बरोबर पुणे जिल्ह्यातील ज्या वाहनांना मुंबई शहरात गाडी न्यायाची नाही अशा वाहनांची सोय आम्ही करू असे आमदार नरेंद्र पाटील यांनी सांगितलं.  याठिकाणी आमदार नरेंद्र पाटील यांच्या वतीने मोर्चेकऱ्यासाठी पाणी, चहा नाश्ताच्या पाकिटांची सोय करण्यात आली आहे. या ठिकाणाहून वाशी स्टेशन अथवा सानपाडा स्टेशन येथून  हार्बर ट्रेन मार्गे रे रॉडला जाता येईल. रे रोड येथून जिजामाता उद्यान जवळ आहे.

रे रोड जवळील बीपीटी येथील  ट्रक टर्मिनलमध्ये अंदाजे 25 हजार गाड्या पार्क करण्याची सोय उपलब्ध असेल. त्यासाठी  या ठिकाणी पार्किंगची जागा स्वछ करण्यात आली आहे. या ठिकाणी वाहनं कशी येतील यासाठी पोलिसांच्या मदतीने रोड आणि ट्रेन मॅप तयार करण्यात आल्याचे मराठा क्रांति मोर्चाचे समन्वयक नाना कुटे पाटील यांनी सांगितलंय.

पनवेल - वाशीकडून येणाऱ्या गाड्या इस्टर्न फ्री वेवरून वाशी एपीएमसी ठिकाणी थांबतील. जे गाड्या घेऊन मोर्च्याच्या दिशेने येऊ इच्छित आहेत त्यांनी वाशी - मानखुर्द - चेंबूर मार्गे ईस्टर फ्री वे वरून रे रोडजवळच्या बीपीटीच्या ट्रक टर्मिनलला आपली वाहनं लावायची आहेत.

नाशिक ठाणे मार्गे येणारी वाहनं इस्टर्न फ्री वेखालून  बीपीटीकडे येतील. नाशिक कल्याण ठाणे मार्गाने येणारी वाहन ठाणे - इस्टर्न हायवेला प्रियदर्शनीला येतील. इथून   फ्री वे खालून बीपीटी ट्रक टर्मिनलला यायचे आहे. मुंबई शहरात वाहनाची गर्दी पाहता मोर्चेकऱ्यांनी कल्याण अथवा ठाणे येथून फास्ट अथवा स्लो ट्रेनने भायखळा स्टेशनला उतरायचं आहे.

वेस्टर्न हायवेवरून येणारी वाहनं, डहाणू , पालघर विरारकडून येणारी वाहनं वेस्टर्न हायवेवरून सांताक्रूझ येथे येतील. या ठिकाणाहून सांताक्रूझ घाटकोपर लिंक  रोडने अमर महाल येथे येतील . अमर महाल येथून प्रियदर्शनी चौक आणि त्यातून इस्टर्न फ्री वेखालून बीपीटी ट्रक टर्मिनलकडे येतील.

वेस्टर्न महामार्गावर ट्राफिक टाळायाचा असेल तर विरार , भाईंदर  बोरिवली , अंधेरी येथून वेस्टर्न रेल्वे ने दादर येथे उतरायचे आहे. तेथून मध्य रेल्वे मार्ग भायखळा येथे जाता येणार आहे. ज्यांना दादर येथे उतरता येणार नाही त्यांनी महालक्ष्मी स्टेशनला उतरून पायी भायखळाकडे जाता येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 8, 2017 07:55 PM IST

ताज्या बातम्या