पालघर-जव्हार-चोथ्याचीवाडी रस्ता गेला वाहून.. 35 गाव-पाड्यांचा संपर्क तुटला

पालघर-जव्हार-चोथ्याचीवाडी रस्ता गेला वाहून.. 35 गाव-पाड्यांचा संपर्क तुटला

गेल्या आठवडा भरापासून पाऊसाच्या संततधारा सुरु असताना जव्हार शहरातील पर्यटनस्थळ असलेल्या हनुमान पॉईंटच्या खाली चोथ्याचीवाडीजवळ संपूर्ण रस्ता वाहून गेला आहे. या भागातील जवळपास 35 गाव-पाड्यांचा संपर्क तुटला आहे.

  • Share this:

पालघर, 7 ऑगस्ट- गेल्या आठवडा भरापासून पाऊसाच्या संततधारा सुरु असताना जव्हार शहरातील पर्यटनस्थळ असलेल्या हनुमान पॉईंटच्या खाली चोथ्याचीवाडीजवळ संपूर्ण रस्ता वाहून गेला आहे. या भागातील जवळपास 35 गाव-पाड्यांचा संपर्क तुटला आहे. तसेच सेलवास-जव्हार बायपासला मोठे तडे गेले आहेत. या परिसरातील नागरिकांचे आणि कॉलेज शाळकरी आणि रुग्णांचे चांगलेच हाल झाले आहेत.

जव्हार- सेलवास बायपासरोडला मोठ मोठाल्या तडा जावून संपूर्ण रस्ता तुटला आहे. त्यामुळे जव्हार बायपास रोड बंद करुन जव्हार शहरातून वाहतूक वळविण्यात आली आहे. मात्र, एका मथेफिरू पिकअप च्या वाहन चालकाने आपले वाहन या मार्गावरुन नेले आणि खचलेल्या रस्त्यात पलटी झाला. सुदैवनाने या अपघातात जीवितहानी झाली नाही.

जव्हार शहराला लागून असलेल्या पर्यटनस्थळ हनुमान पॉईंटच्या खाली नागमोडी वळणावर चोथ्याचीवाडी गावाजवळ रस्ता तुटून गेला आहे. हा रस्ता तुटून जवळजवळ 20 ते 25 फुट रस्त्यात खड्डा पडला आहे. झाप, साकुर दोन्ही रोड बंद झाले आहे. साकुर रामखिंडमार्गे जाणारा वाडा-ठाणे मार्गही बंद झाला आहे. त्यामुळे या झाप-साकुर भागातील 35 गावंपाड्यांचा संपर्क तुटला आहे. या परिसरात दोन आश्रमशाळा आहेत. साकुर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. झाप येथे आरोग्य उपकेंद्र आहे. मात्र, या भागाकडे जानारा रस्ताच बंद झाल्याने रुग्णांचे मोठे हाल झाले आहेत. तसेच या परिसरातील जव्हार येथे शाळा, कॉलेजला येना-या विद्यार्थ्यांना मोठी अडचण निर्माण झाली आहे.

VIDEO : सांगलीत तुरुंगाला पुराचा वेढा, 400 कैद्यांना हलवणार

Published by: Sandip Parolekar
First published: August 7, 2019, 5:56 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading