मुंबईत खड्ड्यांचे बळी, पतीसमोर पत्नी आणि 11 महिन्याच्या मुलावरून गेला डंपर

मुंबईत खड्ड्यांचे बळी, पतीसमोर पत्नी आणि 11 महिन्याच्या मुलावरून गेला डंपर

मुंबईतील खड्डे आणि बेशिस्त वाहन चालक यांच्यामुळे अपघात होऊन आईसह एका 11 महिन्याच्या चुकल्याला आपला जीव गमावण्याची घटना घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवर घडली आहे.

  • Share this:

मनोज कुलकर्णी, प्रतिनिधी

मुंबई, 29 ऑक्टोबर : मुंबईतील खड्डे आणि बेशिस्त वाहन चालक यांच्यामुळे अपघात होऊन आईसह एका 11 महिन्याच्या चुकल्याला आपला जीव गमावण्याची घटना घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवर घडली आहे. यामुळे एक कुटुंब उद्धवस्त झालं आहे. या अपघातामुळे घडशी कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

कचरा जमा करणाऱ्या डपंर चालकाने हॉर्न वाजवला  आणि त्याला साईड देत असताना रस्त्यात आलेला खड्डा दोघांच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना शनिवारी देवनार पोलीस स्टेशनच्या हद्दीत मानखुर्द घाटकोपर लिंक रोडवर घडली. प्रमोद घडशी हे पत्नी पूजा आणि आणि ११ महिन्यांच्या समर्थ या बाळासह आपल्या दुचाकीवर घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवर जात होते.

VIDEO : नशेत कपडे उतरवणाऱ्या मॉडेलचा आणखी एक व्हिडिओ समोर

त्यावेळी पाठीमागून आलेल्या कचरा वाहून नेणाऱ्या डपंर चालकाने जोरात हॉर्न वाजवला त्यामुळे ते दचकले आणि त्याचवेळी समोर असलेला खड्डा चुकविण्याच्या नादात दुचाकी घसरली. ते पत्नी आणि बाळ दुचाकीसह खाली पडले. पण डम्परला वेग काही आवरता आला नाही. त्यावेळी पत्नी आणि बाळ चाकाखाली आल्याने दोघांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी देवनार पोलिसांनी डंपर चालक शम्मी उल्ला रहमत अली शहा याला अटक केली आहे. घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. तर उरलेल्या रस्त्यात खड्डेच खड्डे आहेत. या बाबत राजकीय पक्षांनी आंदोलने ही केली परंतू हे खड्डे काही बुजवले गेले नाही.

घटनास्थळी ज्या खड्ड्यामुळे अपघात झाला तो अखेर स्थानिकांनी बुजवला आहे. डपंर चालकाला अटक झाली देखील परंतू पालिका प्रशासन मात्र जागं झालंच नाही.

VIDEO : भाजप नेत्याने लगावले बार डान्सरसोबत ठुमके, उधळल्या नोटा!

First published: October 29, 2018, 2:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading