मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबई-मांडवा सागरी मार्गावरील रो-रो सेवा झाली सुरू, असे आहेत तिकीटाचे दर

मुंबई-मांडवा सागरी मार्गावरील रो-रो सेवा झाली सुरू, असे आहेत तिकीटाचे दर

 गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे हाल होऊ नयेत म्हणून गुरुवारपासून (20 ऑगस्ट) पुन्हा एकदा ही रो-रो बोट सुरू करण्यात आली आहे.

  • Published by:  Akshay Shitole
मुंबई, 21 ऑगस्ट : कोरोना व्हायरस थैमानाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक सेवा बंद झाल्या. यामध्ये मुंबई-मांडवा मार्गावरील बहुप्रतिक्षित रोरो सेवेचाही समावेश होता. मात्र आता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे हाल होऊ नयेत म्हणून गुरुवारपासून (20 ऑगस्ट) पुन्हा एकदा ही रो-रो बोट सुरू करण्यात आली आहे. रो-रो सेवा सुरू झाल्यामुळे गणेशोत्सवासाठी अलिबाग, मुरुड आणि श्रीवर्धन तालुक्यात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकारक होणार आहे. 15 मार्च रोजी कोरोनाच्या सावटातच ही सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आणि खबरदारी म्हणून ही सेवाही दुसऱ्याच दिवशी बंद करण्यात आली. मात्र ही सेवा सुरू झाली असून 20 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट यादरम्यान सकाळी 9.15 वाजता व्यावसायिक तत्वावर प्रवाशांची पहिली बोट मुंबईतील भाऊचा धक्का येथून मांडवा बंदराकडे निघणार आहे. हीच बोट सायंकाळी 4 वाजता मांडवा येथून परतीचा प्रवास करेल. 30 ऑगस्टनंतर प्रवाशांचा प्रतिसाद पाहून या रो-रो सेवेच्या वेळापत्रकात बदल केला जाणार आहे. याबाबत माहिती बंदर विभागाकडून देण्यात आली आहे. कोरोनाच्या काळात या बोटीमध्ये क्षमतेपेक्षा कमी प्रवाशी वाहतूक करण्यात येणार असल्याने शारीरिक अंतर व शासन नियम पाळणे शक्य होणार आहे. कसे असतील तिकट दर? प्रवासी - 300 रु. पाळीव प्राणी- 300 रु. लहान कार-800 रु. मध्यम आकाराची कार 1000 रु. मोठे चारचाकी प्रवासी वाहन- 1200 रु. दुचाकी -200 रु. सायकल - 100 रु. दरम्यान, कोरोना संदर्भातील परिस्थिती लक्षात घेता भाऊचा धक्का ते मांडवा रो रो सेवेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. 15 मार्च रोजी ही सेवा सुरू झाली आणि कोरोनामुळे दुसऱ्याच दिवशी बंद झाली होती.
First published:

Tags: Roro

पुढील बातम्या