मुंबई, 09 जून : मुंबईमध्ये (Mumbai Rains) पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. त्यामुळे रस्ते, रेल्वे वाहतुकीवर (Mumbai Local) याचा परिणाम झाला आहे. रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. सायन रेल्वे स्थानकाचा रेल्वे ट्रॅक पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. स्थानकाला नदीचे स्वरुप आले आहे.
सायन-कुर्ला भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवा थांबवण्यात आली आहे. हार्बर मार्गावरील लोकल वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
पहिल्या पावसात सायन रेल्वे स्थानकाला नदीचं स्वरूप @Central_Railway @WesternRly @IMDWeather pic.twitter.com/rykteagWbf
— News18Lokmat (@News18lokmat) June 9, 2021
सायन रेल्वे स्थानकावरील ट्रॅकवर सकाळी पाणी साचले होते. पण दुपारपर्यंत जोरदार पावसामुळे पाण्याची पातळी चांगलीच वाढली. त्यामुळे सायन रेल्वे स्थानकावर नदीचे स्वरुप आले होते. त्यामुळे लोकल सेवा थांबवण्यात आली आहे. अनेक प्रवाशांना सायन स्थानकावर पाण्यातून वाट काढत कार्यालय गाठावे लागले आहे. तर काही जणांनी घरी जाणे पसंत केले आहे.
मुंबईत पावसाचा लोकल वाहतुकीवर परिणाम
मुंबईला रात्रभर पावसानं चांगलंच झोडपलं आहे. अजूनही हा पाऊस मुंबईच्या (Mumbai Rain) अनेक ठिकाणी सुरू आहे. मुंबईतल्या पश्चिम उपनगर अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, गोरेगाव दमदार पाऊस सुरू आहे. तर पूर्व उपनगरांमध्ये मुलुंड, भांडूप, घाटकोपर, चेंबूर या परिसरातही पावसाची रिमझिम सुरु आहे. पावसामुळे रेल्वेची वाहतुक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेची मुंबईच्या दिशेनं जाणारी वाहतूक पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्यात आली आहे.
या मुसळधार पावसाचा लोकल वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सायन रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं आहे. पहिल्याच पावसात मुंबतील सखल भागासह अनेक रेल्वे स्थानकांमध्येही पाणी भरलं आहे. मुंबईत मुसळधार पावसामुळ ट्रॅक पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.