Special Report : मुंबईला सर्वात मोठा धोका! संपूर्ण शहर जाणार पाण्याखाली, पहिल्यांदाच आले फोटो समोर

मुंबई शहराला आतापर्यंतचा सर्वात मोठा धोका, पहिल्यांदाच आले फोटो समोर.

News18 Lokmat | Updated On: Nov 1, 2019 07:42 PM IST

Special Report : मुंबईला सर्वात मोठा धोका! संपूर्ण शहर जाणार पाण्याखाली, पहिल्यांदाच आले फोटो समोर

नवी दिल्ली, 1 नोव्हेंबर : समुद्रातील पाण्याचा पातळी दिवसेंदिवस वाढत असल्यामुळं जगभरातील बरेच देश संकटात आहेत. हा पाण्याची पातळी सतत वाढत असल्यामुळं 2050 पर्यंत जगभरातील अनेक शहरांवर याचा विपरीत परिणाम होणार आहे. दरम्यान नुकत्याच एका रिचर्समध्ये याबाबत अभ्यास करण्यात आला. त्यानुसार, पाण्याची पातळी वाढल्यामुळं जगभरातील 15 कोटी लोकांना याचा फटका बसणार आहे. काही वर्षांनंतर या 15 कोटी लोकांकडे राहण्याची सोयही नसणार आहे.

या रिचर्सनुसार समुद्रातील पाण्याच्या वाढत्या पातळीमुळं मुंबई शहर पूर्णपणे नष्ट होऊ शकते, असा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. या रिचर्समध्ये शास्त्रज्ञांनी सॅटेलाइटमधून आलेल्या फोटोंवरून हा निकष काढला आहे. न्यूयॉर्क टाइम्सनं दिलेल्या बातमीनुसार, सॅटेलाइटच्या मदतीनं समुद्रातील पाण्याच्या पातळीची गणना करण्यात आली आहे. यावरून ही पातळी वाढत असल्याचे शास्त्रज्ञांच्या लक्षात आले आहे. हा रिसर्च प्रतिष्ठित जर्नल नेचर कम्युनिकेशननं प्रकाशित केला आहे.

वाचा-स्मार्टफोनचं व्यसन सोडवणार गुगलचा 'पेपर फोन', पाहा VIDEO

संपूर्ण मुंबई जाणार पाण्याखाली

या रिचर्सनुसार भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईचा संपूर्ण विनाश होणार आहे. समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे मुंबईचा बहुतांश भाग हा पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारी मायग्रेशन संस्था कॉर्डिनेटर डायना लोनेस्को यांनी दिलेल्या माहितीत, मुंबईतील लोकांना वाचवण्यासाठी अजूनही योजना आखल्या जाऊ शकतात. त्यासाठी आतापासून तयारीला सुरुवात करणे गरजेचे आहे, असे सांगितले.

Loading...

वाचा-Whatsapp वर कर; तुघलकी निर्णयानंतर पंतप्रधानांना सोडावी लागली खुर्ची!

शांघायवरही मोठे संकट

आशियाई खंडातील सर्वात प्रगतशील असा शांघाय पूर्णपणे पाण्याखाली जाऊ शकतो. या शहराच्या आसपास असणाऱ्या शहरांमध्येही पाणी शिरू शकते. या रिचर्सनुसार कमीत कमी 11 कोटी लोकांचे पुर्नवसन करावे लागेल, यासाठी तयारी करण्याची गरज शांघायला आहे. रिचर्स करणारे जुडे स्ट्रॉस यांनी, शांघायमध्ये अशी परिस्थिती आली तर, लोकांना वाचवणे जास्त कठिण असणार आहे. 2005मध्ये कॅटरिना नावाचे वादळ आले होते, त्यावेळी अशीच परिस्थिती होती.

वाचा-CCTV VIDEO: जेवण चांगल न दिल्याच्या रागातून वेटरला बेदम मारहाण

अॅलेक्झेंड्रिया 2050पर्यंत राहणार नाही

अॅलेक्जेंड्रिया या देशावरही 2050 पर्यंत मोठे संकट येऊ शकते. अॅलेक्झेंड्रिया हा देश अॅलेक्झांडरच्या नावावर ठेवण्यात आले आहे. अॅलेक्झांडरनं या शहराचा शोध लावला होता, त्यामुळं येथे असलेल्या सांस्कृतिक ठेवी नष्ट होऊ शकतात. यानंतर सर्वात मोठ्या इराक देशालाही पाण्याचा स्तर वाढीचा फटका बसू शकतो.

वाचा-आता तुमचा चेहरा करणार पैसे ट्रान्सफर, आलंय भन्नाट फिचर

SPECIAL REPORT : एक भाऊबीज अशीही...शहीदांच्या पत्नीसोबत साजरी केली दिवाळी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 30, 2019 01:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...