आज सकाळीदेखील मुंबईतील तापमान 20 ते 25 अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदवलं गेलं आहे. त्यामुळे गुलाबी थंडीनं मुंबईला जवळपास रामराम ठोकला असल्याचंही होसळीकर यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. रविवारीदेखील मुंबई उपनगरातील कमाल तापमान 36.3 अंश सेल्सियस तर मुंबई शहराचे तापमान 34.6 अंश सेल्सियसपर्यंत नोंदवण्यात आलं होतं. हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार असं दिसतं, की गेल्या 22 वर्षांत मुंबईतील कमाल तपमान 36 अंश सेल्सिअसपर्यंत पोहचण्याची ही तिसरी वेळ आहे. गेल्या 22 वर्षांत 28 फेब्रुवारी 1999 रोजी आतापर्यंतचं सर्वाधिक तापमान 38.5 अंश सेल्सियस नोंदवलं गेलं होतं, त्यानंतर 18 फेब्रुवारी 2017 रोजी 38.4 अंश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं होतं. प्रादेशिक हवामान खात्याच्या शास्त्रज्ञांनी सांगितलं की, पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणाऱ्या वाऱ्याचा प्रवाह अधिक मजबूत झाला आहे. हे गरम वारे समुद्रातून मुंबईकडे येणाऱ्या थंड वाऱ्यांना वाहू देत नाहीत. जेव्हा अशी परिस्थिती उद्भवते तेव्हा मुंबईचे तापमान जास्त वाढते. त्यामुळे, सध्या तापमानात वाढ नोंदवली गेली आहे.24 Feb, Mumbai temp is going as high as 35 Plus with departure of 3 to 4 Deg C from its normal. Tmin also today morning showing rise with min ranging between 20 - 25 Deg Mumbai Winter almost saying good Bye.... pic.twitter.com/GrMyB5HKF2
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) February 24, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai News