Home /News /mumbai /

मुंबईत चोर समजून जमावानं रिक्षा चालकाला दिला भयंकर मृत्यू, आधी हातपाय बांधले आणि मग...

मुंबईत चोर समजून जमावानं रिक्षा चालकाला दिला भयंकर मृत्यू, आधी हातपाय बांधले आणि मग...

Murder in Mumbai: मुंबईतील समता नगर परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील काही जणांनी चोर समजून एका रिक्षा चालकाला बेदम मारहाण केली आहे. या हल्ल्यात रिक्षा चालकाचा दुर्दैवी अंत झाला आहे.

    मुंबई, 24 जानेवारी: मुंबईतील (Mumbai) समता नगर परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील काही जणांनी चोर समजून एका रिक्षा चालकाला बेदम मारहाण (rickshaw driver mob lynching) केली आहे. आरोपींनी रिक्षाचालकाचे हातपाय बांधून त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत क्रूरतेचा कळस गाठला आहे. या हल्ल्यात संबंधित रिक्षाचालक गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा एक सीसीटीव्ही व्हिडीओ (CCTV Video) देखील समोर आला असून एक संतप्त जमाव रिक्षा चालकाला मारहाण करताना दिसत आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल (FIR lodged) केला असून घटनेचा तपास पोलीस करत आहेत. शाहरुख शेख असं हत्या झालेल्या रिक्षाचालकाचं नाव असून तो समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दामी नगर परिसरातील रहिवासी होता. घटनेच्या दिवशी तो समता नगर परिसरात असताना काही स्थानिक नागरिकांनी चोर समजून त्याला बेदम मारहाण केली आहे. मारेकऱ्यांनी रिक्षा चालकाचे हातपाय बांधून त्याला निर्मल चाळीजवळ फेकून दिलं होतं. या घटनेच्या 2 तासांनंतर स्थानिकांनी याची माहिती समता नगर पोलीसांना दिली. हेही वाचा-चांगुलपणा नडला! मध्यस्थी करायला गेला अन् मारेकऱ्यांचा ठरला बळी, बीडमधील घटना समता नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, रिक्षाचालक शाहरुख शेख हा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं दिसून आला. यानंतर पोलिसांनी त्याला तातडीने शताब्दी रुग्णालयात दाखल केलं. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. उपचारादरम्यान रिक्षा चालक शाहरुख शेखची प्राणज्योत मालवली आहे. 15 जानेवारी रोजी त्याने अखेरचा श्वास घेतला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आल्यानंतर, रिक्षाचालक शेख याचे नातेवाईक संतप्त झाले असून त्यांनी रविवारी उत्तर प्रदेश विभागाचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण पडवळ यांच्या कार्यालयाबाहेर हत्येचा गुन्हा दाखल करण्यासाठी धरणं आंदोलन केलं आहे. हेही वाचा-भयंकर! अनैतिक संबंधाचा झाला रक्तरंजित शेवट, हिंगोलीत तरुणाची दगडाने ठेचून हत्या दरम्यान, या प्रकरणात तपास अधिकारी सहकार्य करत नसल्याचा आरोप मृत रिक्षा चालकाच्या आईनं केला आहे. माझ्या मुलाची हत्या करण्यात आली असून माझ्या मुलाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. चोर असल्याचं भासवून त्याला मुद्दाम मारहाण केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या घटनेचा पुढील तपास समता नगर पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Mumbai, Murder

    पुढील बातम्या