मुंबई, 06 मे : लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात दारू विक्रीला परवानगी देण्यात आली होती. महाराष्ट्रात दोन दिवसात झालेल्या दारूविक्रीची आकडेवारी समोर आली आहे. राज्यात तब्बल 62 कोटी 55 लाख रुपयांचे मद्य विकले गेले आहे. तर राज्यात 33 जिल्ह्यात मद्य विक्री सुरू करण्यात आली आहे. 9 जिल्ह्यात मद्य विक्रीस मनाई तर 2 जिल्हयात सुरू केलेली मद्य विक्री बंद केली गेली.
राज्यात मद्य विक्रीस परवानगी देण्यात आली असून गेल्या 24 तासात राज्यात फक्त 35 टक्के मद्य विक्री झाली. या 35 टक्के मद्यविक्री दुकानातून गेल्या 24 तासात तब्बल 62 कोटी 55 लाख रुपयांचे मद्य विकलं गेलं आहे.
राज्यात एकूण 33 जिल्ह्यात मद्य विक्रीस परवानगी दिली गेली आहे. तर 9 जिल्ह्यात मद्य विक्रीस परवानगी नाकारली गेली आहे आणि 2 असे जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये मद्य विक्री सुरू केली होती. मात्र, काही कारणास्तव त्या दोन जिल्हयात मद्य विक्री बंद केली आहे. अवैध मद्य विक्रीतून जवळपास 13 कोटी रुपयांचा मुद्देमाल उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे. राज्यात एकूण 10 हजार 822 परवानाधारक मद्य विक्री दुकाने असून यापैकी फक्त 3 हजार 543 परवानाधारक मद्य विक्री वाईनशॉपमधून मद्य विक्री केली गेली आहे.
हेही वाचा - गर्दी कमी करण्यासाठी दिल्लीत ‘दारु’वर 70 टक्के टॅक्स Home Deliveryही मिळणार
जी जवळपास राज्याच्या तुलनेत 35 टक्के असून या मद्य विक्रीतून राज्याला एकाच दिवसात तब्बल 62 कोटी 55 लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. तर उद्या पासून सर्व वाईनशॉपवर टोकन पद्धत सुरू करण्याचे आदेश देण्यात आले असून वाईनशॉपवर गर्दी दिसल्यास वाईनशॉप मालकावर कारवाई करण्यात येईल अशी सक्त ताकीद देण्यात आली आहे. त्यामुळे जर वाईनशॉप बाहेर गर्दी केली तर मद्य तर मिळणार नाही पण जेलची हवा नक्की खावी लागेल असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
कोणत्या जिल्ह्यात मद्य विक्री सुरू?1. मुंबई शहर (आज निर्णय मागे) 2. मुंबई उपनगर 3. ठाणे 4. पालघर 5. रायगड 6. पुणे 7. अहमदनगर 8. कोल्हापुर 9. सांगली 10. सिंधुदुर्ग 11. रत्नागिरी 12. धुळे 13. नंदुरबार 14. जळगाव 15. भंडारा 16. बुलढाणा 17. नाशिक
हेही वाचा - लॉकडाऊनमधील आर्थिक चणचण जीवघेणी; रिक्षाचालकाने स्वत:च्याच गळ्यावर फिरवला सुरामद्यविक्री सुरू करण्यास परवानगी नसलेले जिल्हे1. सोलापूर 2. सातारा 3. औरंगाबाद 4. जालना 5. बीड 6. नांदेड 7. परभणी 8. हिंगोली 9. नागपूरसुरू केलेली मद्य विक्री बंद करण्यात आलेले जिल्हे1.मुंबई 2. उस्मानाबाद 2. लातूर
मुंबई शहरात दारू विक्री सुरू करण्यात आली होती, पण तळीरामांनी दुकानात एकच गर्दी केली होती. त्यामुळे मुंबईत तुर्तास दारू विक्री बंद करण्यात आली आहे.
संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.