Home /News /mumbai /

कोरोनाच्या नव्या व्हायरसमुळे खळबळ, नवी मुंबईतील 'त्या' व्यक्तींना विशेष आवाहन!

कोरोनाच्या नव्या व्हायरसमुळे खळबळ, नवी मुंबईतील 'त्या' व्यक्तींना विशेष आवाहन!

ज्या व्यक्ती 25 नोव्हेंबर नंतर इंग्लंडवरून भारतात नवी मुंबईत आल्या आहेत, अशा व्यक्तींची यादी महानगरपालिकेने प्राप्त करून घेतलेली असून त्यांच्याशी संपर्क साधणे सुरू केले आहे.

    मुंबई, 25 नोव्हेंबर : इंग्लंड (England )आणि काही इतर देशांमध्ये नवीन प्रकारचा कोरोना विषाणू (New strain of virus in UK) आढळून आल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.  केंद्र व राज्य सरकारने तातडीने खबरदारी घेत विमान सेवा बंद केली आहे. मार्गदर्शक सूचनांनुसार 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर या कालावधीत इंग्लडहून मुंबई आणि नवी मुंबईत आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या व्यक्ती 25 नोव्हेंबर नंतर इंग्लंडवरून भारतात नवी मुंबईत आल्या आहेत, अशा व्यक्तींची यादी महानगरपालिकेने प्राप्त करून घेतलेली असून त्यांच्याशी संपर्क साधणे सुरू केले आहे. त्यातूनही ज्या व्यक्ती 25 नोव्हेंबरनंतर इंग्लंडवरून नवी मुंबईत आल्या आहेत त्यांनी स्वत:हून नवी मुंबई महानगरपालिकेच्या नजिकच्या आरोग्य केंद्राशी/आरोग्य विभाग मुख्यालयाशी संपर्क साधवा अथवा 1800222309 / 1800222310 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून या विशेष सर्वेक्षणात सहकार्य करावे, असं आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. इंग्लंडमधील काही भागात जनुकीय रचनेत बदल झालेला करोना विषाणूचा नवीन स्ट्रेन आढळलेला आहे. या विषाणूचा प्रसार अधिक वेगाने होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे 25 नोव्हेंबरनंतर इंग्लंडवरून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आलेल्या व्यक्तींनी त्वरित नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाशी संपर्क साधावा असं आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.  या व्यक्तींकरिता आरटी-पीसीआर चाचणी सुविधा एमजीएम रूग्णालय, सेक्टर 30, सानपाडा,वाशी येथे करण्यात आलेली आहे. त्यासोबतच मागील काही दिवसांपासून दैनंदिन कोरोना बाधितांच्या संख्येत घट होताना दिसत असली तरी नागरिकांनी सावधगिरी बाळगून मास्कचा नियमित वापर, सोशल डिस्टन्सिंग आणि वारंवार हात धुणे या कोरोनापासून बचावाच्या त्रिसूत्रीचे काटेकोरपणे पालन करणे व "कोविड बचावात्मक अनुकूल वर्तन (COVID Appropriate Behavior)" ठेवणे गरजेचे आहे. सुरक्षा नियमांचे पालन हीच कोरोनापासून बचावाची ढाल आहे हे लक्षात घेऊन सर्व नागरिकांनी स्वत:च्या व इतरांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिका अभिजीत बांगर यांनी केले आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या