मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबई लोकल सुरु करा किंवा प्रत्येकाला 5000 रुपये भत्ता द्या, भाजपची ठाकरे सरकारकडे मागणी

मुंबई लोकल सुरु करा किंवा प्रत्येकाला 5000 रुपये भत्ता द्या, भाजपची ठाकरे सरकारकडे मागणी

राज्य सरकारने मुंबई लोकल सुरू करावी किंवा प्रत्येक प्रवाशाला 5 हजार रुपये प्रवास भत्ता द्यावा, अशी मागणी भाजपने केली आहे.

राज्य सरकारने मुंबई लोकल सुरू करावी किंवा प्रत्येक प्रवाशाला 5 हजार रुपये प्रवास भत्ता द्यावा, अशी मागणी भाजपने केली आहे.

राज्य सरकारने मुंबई लोकल सुरू करावी किंवा प्रत्येक प्रवाशाला 5 हजार रुपये प्रवास भत्ता द्यावा, अशी मागणी भाजपने केली आहे.

  • Published by:  desk news

मुंबई, 12 जुलै : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा (Second wave of corona virus) जोर ओसरला असला तरी मुंबई लोकल (Mumbai Local) मात्र सामान्यांसाठी सुरु झालेली नाही. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत. राज्य सरकारने मुंबई लोकल सुरू करावी किंवा प्रत्येक प्रवाशाला 5 हजार रुपये प्रवास भत्ता (Rs. 5000 travel allownce) द्यावा, अशी मागणी भाजपने (BJP) केली आहे. मुंबईकरांची जीवनवाहिनी असणारी लोकल रेल्वेसेवा विनाकारण बंद ठेऊन राज्य सरकारला (State government) सामान्यांची गळचेपी करत असल्याची भूमिका भाजपनं घेतली आहे.

लोकल सुरु करा किंवा 5 हजारांचा भत्ता द्या

राज्य सरकारनं लोकल सेवा बंद ठेवली असल्यामुळे सामान्यांचे हाल तर होत आहेतच, शिवाय कोरोनाच्या या संकटकाळात त्यांच्या खिशावरही भार पडत आहे. केंद्र सरकारने ग्रीन सिग्नल दिला असतानाही राज्य सरकार मुंबई लोकल का सुरु करत नाही, असा सवाल भाजपनं केला आहे. सध्या केवळ अत्यावश्यक सेवेतील नागरिकांनाच लोकलने प्रवास करण्याची मुभा आहे. मात्र सर्वसामान्य माणसांनी काय करायचे, असा प्रश्न विचारत ठाकरे सरकारला कोंडित पकडण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे.

लस घेतलेल्यांना परवानगी द्या

कोरोना प्रतिबंधक लसीचे एक किंवा दोन डोस घेतलेल्या नागरिकांना मुंबई लोकलचा प्रवास सरकारने सुरु करावा, अशी मागणी भाजपने केली आहे. इतर सर्व व्यवहार टप्प्याटप्प्याने सुरु होत आहेत. परिवहनाची इतर माध्यमे सुरू झाली आहेत. मग केवळ मुंबईतील लोकल सेवा बंद ठेऊन सरकारला काय साध्य करायचे आहे, असा सवालही भाजपने केला आहे.

हे वाचा -सुसाइड..राजीनामा..आणि...; संजय राठोडांनी आखला नवा कमबॅक प्लान

यातही कमिशन नाही ना?

सरकारने लोकल सेवा बंद ठेवल्यामुळे सामान्यांना खासगी वाहतुकीचा वापर करावा लागतो. त्यामुळे त्यांच्या वेळेवर आणि बजेटवरही परिणाम होतो. या सरकारने खासगी वाहतूकदारांसोबत काही साटेलोटे तर नाही ना, त्यांच्याकडून काही कमिशन वगैरे तर घेतले नाही ना? असा खोचक सवाल भाजपनं मविआ सरकारला केला आहे. आता यावर सरकारकडून काय उत्तर येतं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

First published:

Tags: BJP, Maharashtra politics, Mumbai local