मुंबई विद्यापीठाचे फक्त 153 निकाल जाहीर; विधानसभेत उद्या हक्कभंग प्रस्ताव

मुंबई विद्यापीठाचे फक्त 153 निकाल जाहीर; विधानसभेत उद्या हक्कभंग प्रस्ताव

शिवसेना उद्या विनोद तावडेंविरोधात हक्कभंग प्रस्ताव विधानसभेत आणणार आहे.

  • Share this:

मुंबई,31 जुलै: बराच काळ प्रतीक्षा केल्यानंतर आज सकाळी मुंबई विद्यापीठाच्या  477 पैकी 153 निकाल जाहीर करण्यात आले असल्याचा दावा मुंबई विद्यापीठाने केला आहे.अजूनही ३ लाख २५ हजार ३०५ उत्तरपत्रिकांचे  मुल्यांकन बाकी असल्यामुळे 31 जुलैची डेडलाईल पाळली जाण्याची शक्यता धुसर झाली आहे. शिवसेना उद्या विनोद तावडेंविरोधात हक्कभंग प्रस्ताव विधानसभेत आणणार आहे.

मुंबई विद्यापीठाच्या कला शाखेचे ७८, तंत्रज्ञान शाखेचे ४८, विज्ञान आणि व्यवस्थापन शाखांचे  प्रत्येकी १० तर वाणिज्य शाखेचे ७ निकाल जाहीर करण्यात आले आहेत. विविध शाखांतील ५५ निकाल तयार असून ते लवकरच जाहीर केले जाणार असल्याचीही माहितीही विद्यापीठाने दिली आहे.

एकुण १७ लाख ३६ हजार १४५ उत्तरपत्रिकांपैकी ९० टक्के उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन झालं आहे. मात्र  मूल्यांकन अजूनही बाकी असून ते लवकरच केलं जाणार आहे. अजून 340 निकाल जाहीर होणं बाकी आहेत.

First published: July 31, 2017, 8:38 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading