मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

दहीहंडी आणि गणेशोत्सवात निर्बंध लावाच, केंद्राची राज्य सरकारला सुचना, राम कदम घेणार का पाऊल मागे?

दहीहंडी आणि गणेशोत्सवात निर्बंध लावाच, केंद्राची राज्य सरकारला सुचना, राम कदम घेणार का पाऊल मागे?

महाराष्ट्रासह इतरही काही राज्यात विषाणूच्या नव्या प्रकाराचा संसर्ग वाढतोय असे लक्षात आले आहे, त्यामुळे ही काळजी घेणे गरजेचे आहे असे केंद्रीय आरोग्य विभागाच्या या पत्रात म्हटले आहे.

महाराष्ट्रासह इतरही काही राज्यात विषाणूच्या नव्या प्रकाराचा संसर्ग वाढतोय असे लक्षात आले आहे, त्यामुळे ही काळजी घेणे गरजेचे आहे असे केंद्रीय आरोग्य विभागाच्या या पत्रात म्हटले आहे.

महाराष्ट्रासह इतरही काही राज्यात विषाणूच्या नव्या प्रकाराचा संसर्ग वाढतोय असे लक्षात आले आहे, त्यामुळे ही काळजी घेणे गरजेचे आहे असे केंद्रीय आरोग्य विभागाच्या या पत्रात म्हटले आहे.

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 28 ऑगस्ट : कोरोनाच्या (corona third wave)  तिसऱ्या लाटेचा धोका पाहता  राज्य सरकारने दहीहंडी उत्सवला (dahi handi 2021) परवानगी नाकारली आहे. पण, दुसरीकडे भाजपचे आमदार राम कदम (bjp mla ram kadam) यांनी दहीहंडी कार्यक्रम घेणारच असा पवित्रा घेतला आहे. आता केंद्र सरकारने (center government) सुद्धा आगामी दहीहंडी आणि गणेशोत्सवात (ganpati festival 2021) गर्दी टाळण्यासाठी स्थानिक स्वरूपाचे निर्बंध लावण्यात यावेत अशी सुचना केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी मुख्य सचिवांना एका पत्राद्वारे केली आहे. महाराष्ट्रात संसर्ग कमी होत असला तरी काही जिल्ह्यांत पॉझिटीव्हिटी दर आणि कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्याने केंद्राने ही सुचना केली आहे.

राज्य शासनाने यापूर्वीच यासंदर्भात सूचना दिल्या होत्या, आणि आता केंद्रीय आरोग्य विभागाने देखील या उत्सवांमध्ये काळजी घेण्याची गरज असल्याचा सांगून त्याला दुजोरा दिला आहे. त्यामुळे आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पत्राच्या अनुषंगाने केले आहे.

मोठा निर्णय:BESTमधील महिलांच्या आरक्षित सीटवर बसणाऱ्या पुरुषांना आता उठावच लागेल

कोविडचा धोका अजून गेलेला नसल्याने हे उत्सव सुपर स्प्रेडर्स ठरू शकतात अशी भीती आयसीएमआर आणि एनसीडीसीने यापूर्वी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रासह इतरही काही राज्यात विषाणूच्या नव्या प्रकाराचा संसर्ग वाढतोय असे लक्षात आले आहे, त्यामुळे ही काळजी घेणे गरजेचे आहे असे केंद्रीय आरोग्य विभागाच्या या पत्रात म्हटले आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राने आणि देशानेही संसर्ग रोखण्यात यश मिळविले आहे. त्यामुळे टेस्ट –ट्रेक-ट्रीट वर भर देणे तसंच कोविड संदर्भातील सर्व आरोग्याचे नियम याचे पालन कटाक्षाने होईल हे पाहणे गरजेचं आहे, असेही या पत्रात म्हटलं आहे.

काजोल ते करीना कपूर या अभिनेत्रींना चित्रिकरणा दरम्यानचं मिळाली होती 'Good News'

दरम्यान, राज्य शासनाने यापूर्वीच यासंदर्भात सूचना दिल्या होत्या, आणि आता केंद्रीय आरोग्य विभागाने देखील या उत्सवांमध्ये काळजी घेण्याची गरज असल्याचे सांगून त्याला दुजोरा दिला आहे.  आज आपण जनतेच्या जीवाला जास्त महत्व देणे गरजेचे आहे हे यातून अधोरेखित होते आहे, असं सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांनी आरोग्याच्या नियमांचे कसोशीने पालन करणे गरजेचे आहे तसंच राज्य शासन वेळोवेळी यासंदर्भात ज्या सूचना देईल ते जनतेच्या हिताचेच असल्याने राजकीय, सामाजिक, आणि सर्व थरांतील लोकांनी कृपया सहकार्य करावे, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी परत एकदा केले आहे.

'कोविडची टांगती तलवार आपल्यावर कायम आहे हे विसरू नका. स्वत:बरोबर इतरांच्या आरोग्याची देखील काळजी घ्या आणि एक आपण या कोविड काळात एक जबाबदार नागरिक म्हणून कसे वागलात हे देशाला दाखवून द्या, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

Explainer: तालिबानचा कथित म्होरक्या हिबातुल्लाह अखुंदजादा आहे तरी कुठे?

तर दुसरीकडे, राज्य सरकारने आधीच दहीहंडी उत्सव घेण्यास मनाई केली आहे. पण, भाजपचे आमदार राम कदम यांनी काहीही झालं तरी दहीहंडी उत्सव घेणारच अशी घोषणा केली आहे. त्यांच्यापाठोपाठ मनसेनं सुद्धा दहीहंडी उत्सव घेण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता केंद्राकडूनच पत्र आल्यामुळे राम कदम काय निर्णय घेतात हे पाहण्याचं ठरणार आहे.

First published: