मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /Fractured Freedom पुस्तकामुळे वाद; लेखिका प्रज्ञा दया पवार यांचा तडकाफडकी राजीनामा

Fractured Freedom पुस्तकामुळे वाद; लेखिका प्रज्ञा दया पवार यांचा तडकाफडकी राजीनामा

प्रज्ञा दया पवार

प्रज्ञा दया पवार

मी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 13 डिसेंबर : Fractured Freedom या पुस्तकामुळे वाद निर्माण झाला आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार काढून घेतल्यानंतर लेखिका प्रज्ञा दया पवार यांनी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. फेसुबकवर त्यासंदर्भातील पत्र पोस्ट करत त्यांनी याबाबतची माहिती दिली.

फेसबुक प्रज्ञा दया पवार यांनी शेअर केलेले पत्र -

मी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. त्यासंदर्भातील मा. प्रधान सचिवांना पाठवलेले पत्र सर्वांच्या माहितीसाठी देत आहे.

१३/१२/२०२२

प्रति,

मा. प्रधान सचिव

मराठी भाषा विभाग,

नवीन प्रशासन भवन, आठवा मजला,

मंत्रालय,

मुंबई- ४०००३२

विषय : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणेबाबत

महोदय,

स.न.वि.वि.

दिनांक २७ मे २०२१ रोजीच्या पत्रानुसार (क्रमांक : सासंम/2021/1202) माझी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्याचे पत्र मला पाठवले गेले होते. तेव्हापासून मी मंडळावर कार्यप्रवण आहे. आज मंडळाच्या सदस्यत्वाचा मी पुढील कारणास्तव राजीनामा देत आहे.

यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांतर्गत कोबाड गांधीलिखित आणि अनघा लेले अनुवादित ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या पुस्तकाला घोषित झालेला अनुवादित श्रेणीतील तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार आपल्याकडून जी. आर. काढून रद्द करण्यात आला आहे. तसेच पुरस्कारासाठी पुस्तकाची शिफारस करणारी परीक्षण समितीदेखील आपण एकतर्फी बरखास्त केली आहे. यातून तज्ज्ञांच्या निवड समितीचा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोकशाही प्रक्रियेचा अवमान झाला आहे, अशी माझी धारणा आहे.

याचा निषेध म्हणून मी माझा राजीनामा देत आहे.

मंजूर व्हावा ही विनंती.

आपली विश्‍वासू,

डॉ. प्रज्ञा दया पवार

First published:

Tags: Maharashtra News