मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /BREAKING : काँग्रेसमध्ये मोठे होणार फेरबदल, या नेत्याला मंत्रिपद देण्याची शक्यता

BREAKING : काँग्रेसमध्ये मोठे होणार फेरबदल, या नेत्याला मंत्रिपद देण्याची शक्यता


महाराष्ट्रातील काँग्रेस नेते आज रात्री दिल्लीला जाणार आहेत. राज्यातील प्रश्नांवर वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करणार आहे...

महाराष्ट्रातील काँग्रेस नेते आज रात्री दिल्लीला जाणार आहेत. राज्यातील प्रश्नांवर वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करणार आहे...

महाराष्ट्रातील काँग्रेस नेते आज रात्री दिल्लीला जाणार आहेत. राज्यातील प्रश्नांवर वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करणार आहे...

मुंबई, 18 मार्च : सचिन वाझे  (Sachin Vaze arrest) प्रकरणामुळे अडचणीत सापडलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्येही (MVA Government) फेरबदल केले जाण्याची शक्यता आहे. त्यानुसार काँग्रेसमध्येही (Congress) अंतर्गत बदल केले जाणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांची मंत्रिपदासाठी वर्णी लागण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील काँग्रेस नेते आज गुरुवारी रात्री दिल्लीला जाणार आहेत. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut), सुनिल केदार (Sunil Kedar) हे नेते दिल्लीत पोहचणार असल्याची माहिती मिळत आहे.

BREAKING : 10 वी आणि 12वीच्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना महत्त्वाची सूचना

नवी दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत गुरुवारी आणि शुक्रवारी गाठीभेटी आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि राज्यातील काँग्रेस धोरण, अडचणीत आलेले मुद्दे, पक्षाअंतर्गत असलेल्या नाराजी वर चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

तीन दिवसांपूर्वीच वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेतली होती. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती.

ममता सरकारचा पराभव पक्का', मोदींचा दावा! 'खेला होबे' घोषणेलाही दिलं उत्तर

यावेळी तिन्ही नेत्यांनी मंत्रिमंडळात फेरबदल करण्यास एकमत व्यक्त केले.  'मंत्रिमंडळात फेरबदलासंदर्भात सोनिया गांधी, शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील. लवकरच तुम्हाला याबद्दल कळेल, अशी सूचक प्रतिक्रिया त्यावेळी नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर दिली होती. मिळालेल्या माहितीनुसार, होळी आणि पौर्णिमेनंतर महाविकास आघाडीतील काही मंत्र्यांचे खाते हे बदलले जाणार आहे.

अनिल देशमुख यांचे गृहमंत्रिपद जाणार?

अनिल देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू सहकारी असले तरी त्यांच्या कामगिरीवर नाराज असल्याचे बोललं जात आहे. गेले वर्षभर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या खात्यावर अनेक प्रश्नं उपस्थित करण्यात आले होते. सुशात सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण ते आताचे सचिन वाझे प्रकरणापर्यंत गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख चोख कामगिरी करू शकले नाहीत, अशी भूमिका महाविकास आघाडीच्या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांमध्ये आहे.

वनमंत्रिपदी कुणाची वर्णी?

शिवसेनेचे रिक्त झालेले वन मंत्रालय तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील गृहमंत्रिपदी नवीन मंत्र्यांची नियुक्ती केली जाण्याची शक्यता सूत्रांनी दिली आहे.  वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा याआधीच मंजूर झाला असल्यामुळे त्यांच्या खात्याची जबाबदारीही शिवसनेच्या मंत्री मंडळाबाहेरील नव्या व्यक्तीवर सोपवण्याची तयारी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

काँग्रेसमध्येही अंतर्गत बदल

तर काँग्रेसमध्ये सुद्धा अंतर्गत बदल केले जाणार आहे. वाढीव वीज बिलाच्या मुद्यावरून नितीन राऊत यांना टीकेचा सामना करावा लागला होता. अर्थसंकल्पीय अधिवेशनात नितीन राऊत यांना विधानसभा अध्यक्षपदासाठी विचारले गेले होते पण त्यांनी नकार दिला होता. त्यामुळे आगामी काळात काँग्रेसकडे असलेल्या काही खात्यांमध्ये बदल केली जाण्याची शक्यता आहे.

First published:
top videos