बीडमध्ये या प्रवर्गासाठी सुटले जि.प. अध्यक्षपद.. अशी आहे आरक्षण सोडत

बीडमध्ये या प्रवर्गासाठी सुटले जि.प. अध्यक्षपद.. अशी आहे आरक्षण सोडत

बीड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी सुटले आहे. यामुळे मुंडे बहीण-भावात पुन्हा एकदा रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.

  • Share this:

मुंबई,19 नोव्हेंबर: बीड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी सुटले आहे. यामुळे मुंडे बहीण-भावात पुन्हा एकदा रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. बीडची जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना पुन्हा शर्तीचे प्रयत्न करावे लागणार आहे.

दरम्यान, राज्यातील 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाची आरक्षण सोडत जाहीर मंगळवारी जाहीर करण्यात आली. आरक्षण काढताना 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या गृहीत धरण्यात आली. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे आरक्षण काढताना संबंधित जिल्ह्यातील ग्रामीण लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने प्रवर्गनिहाय आरक्षण काढण्यात आले. प्रवर्गाचे आरक्षण निश्चित केल्यानंतर त्यातून महिलांचे आरक्षण देव चिठ्ठी टाकून काढण्यात आले.

मुंबईसह राज्यातील सर्व 34 जिल्हा परिषद अध्यक्षपदाची आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. गृहविभागाचे अपर मुख्य सचिव संजयकुमार यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत काढण्यात आली. रत्नागिरी, नाशिक, साताऱ्यासह आठ जिल्हा परिषदांची अध्यक्षपदे खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत, लातूर जिल्हापरिषद अध्यक्षपद मागास प्रवर्गासाठी तर तर सोलापूर आणि जालना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी राखीव आहे.

ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, विधी व न्याय विभागाचे सहसचिव द. सं. पाटील, विमुक्त जाती, ग्रामविकास विभागाचे उपसचिव आर. ए. नागरगोजे, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग कल्याण विभागाचे उपसचिव रविंद्र गुरव, औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर, चंद्रपूर जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, ठाणे जि.प. अध्यक्षा दीपाली पाटोळे यांच्यासह राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, जिल्हा परिषदांचे सदस्य उपस्थित होते.

अशी आहे 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाची आरक्षण सोडत

- अनुसूचित जाती (सर्वसाधारण) : सोलापूर, जालना

- अनुसूचित जाती (महिला) : नागपूर, उस्मानाबाद

- अनुसूचित जमाती (सर्वसाधारण) : नंदुरबार, हिंगोली

- अनुसूचित जमाती (महिला) : पालघर, रायगड, नांदेड

- नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण) : लातूर, कोल्हापूर, वाशीम, अमरावती

- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : ठाणे, सिंधुदुर्ग, सांगली, वर्धा, बीड

- खुला (सर्वसाधारण) : रत्नागिरी, नाशिक, धुळे, गडचिरोली, गोंदिया, सातारा, अकोला, भंडारा

- खुला (महिला) : जळगाव, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, परभणी, बुलडाणा, यवतमाळ, चंद्रपूर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 19, 2019 03:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading