'अर्णब गोस्वामी हा भाजपचा लाऊड स्पीकर'

'भाजपच्या केंद्रातील आणि राज्यातील नेत्यांनी एकत्र येऊन अन्वय नाईक (anvay naik) यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली पाहिजे, त्याचे अश्रू पुसले पाहिजे'

'भाजपच्या केंद्रातील आणि राज्यातील नेत्यांनी एकत्र येऊन अन्वय नाईक (anvay naik) यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली पाहिजे, त्याचे अश्रू पुसले पाहिजे'

  • Share this:
    मुंबई, 05 नोव्हेंबर : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी (anvay naik suicide case) रिपब्लिक टीव्हीचे (republic tv) संपादक अर्णब गोस्वामी (arnab goswami ) यांना अटक केल्यामुळे भाजपने (BJP) राज्यभरात आंदोलन पुकारले आहे. पण, 'अर्णब गोस्वामी हे भाजपचे कार्यकर्ते आहे, आपल्या कार्यकर्त्याने नेमका काय गुन्हा केला आहे, हे एकदा समजून घ्या', असा सल्लावजा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लगावला. तसंच, 'अर्णब गोस्वामी हा भाजपचा लाऊड स्पीकर आहे' असा टोलाही त्यांनी लगावला. टीव्ही 9 मराठी वृत्तवाहिनीशी बोलत असताना संजय राऊत यांनी अर्णब गोस्वामी अटक प्रकरणावरून भाजपला खडेबोल सुनावले आहे. 'अर्णब गोस्वामी हा भाजपचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते हे देशभरात रस्त्यावर उतरले आहे. कदाचित हा त्यांचा राष्ट्रीय कार्यक्रम असेल तर त्यांनी तो करावा. अन्वय नाईक यांच्या मुलीने बुधवारी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. त्यांच्या मुलीची पत्रकार परिषद ऐकून जर भाजप नेत्याला पाझर फुटली नसेल तर मानवतावाद, न्याय या शब्दांचा वापर करू नये' असा टोला राऊत यांनी भाजपला लगावला. टीममध्ये निवड होण्याकरता वडिलांकडे मागण्यात आली होती लाच, विराटचा गौप्यस्फोट 'भाजप नेत्यांनी आंदोलन करण्याआधी अन्वय नाईक यांच्या घरी जाऊन त्यांच्यावर काय संकट कोसळले आहे, हे समजून घेतले असते तर कोणत्याही व्यक्तीला मन आहे, मग तो राजकीय नेता असता तर त्याने रस्त्यावर उतरण्याचे काम केले नसते, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही' असंही राऊत म्हणाले. 'रिया चक्रवर्ती प्रकरणात तुमची वेगळी भूमिका असते, आणि अन्वय नाईक आणि त्यांच्या आईबद्दल वेगळी भूमिका घेणे याला राज्यकर्म म्हणता येणार नाही. महाराष्ट्राचे पोलीस हे कठपुतलीच्या बाहुल्या नाही. जे रिया चक्रवर्ती प्रकरणात झाले, तसे इथं झाले नाही. महाराष्ट्र पोलीस स्वतंत्र्य पद्धतीने चौकशी करत आहे' असंही राऊत म्हणाले. 'अर्णब गोस्वामी हे भाजपचे कार्यकर्ते आहे. ते भाजपची बाजू चॅनेलमधून मांडत असता. जसे शिवसेनेचे मुखपत्र सामना आहे, त्याच प्रकारे भाजपचे चॅनेल आहे. कदाचित ते भाजपचे लाऊड स्पीकरअसतील. पण त्या कार्यकर्त्याने कोणता गुन्हा केला आहे, हे समजून घेण्याची गरज आहे. ते पत्रकार आहे म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली नाही. गोस्वामी यांचं नाव हे सुसाईट नोटमध्ये आहे. सुशांत सिंह प्रकरणात अशी कोणतीही सुसाईट नोट आढळून आली नाही. पण त्या प्रकरणात केंद्रातील आणि राज्यातील भाजपची वेगळी भूमिका मांडली होती' असं म्हणत राऊत यांनी भाजपला खडसावले. पळून लग्न केले पण तरुणीने बदलला जबाब, तरुणाने पहिल्या मजल्यावरून टाकली उडी 'या प्रकरणाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी काहीही संबंध नाही. जर या प्रकरणाचे सत्य समोर मांडण्याचा प्रयत्न केला आणि पडद्यामागे काय काय घडामोडी घडल्या, हे जर समोर आणले तर पळता भुई थोडा होईल, असा इशारा संजय राऊत यांनी भाजपला दिला. 'भाजपच्या केंद्रातील आणि राज्यातील नेत्यांनी एकत्र येऊन अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली पाहिजे, त्याचे अश्रू पुसले पाहिजे. मुळात भाजप आंदोलन करत असल्यामुळे त्यांचेच वस्त्रहरण होत आहे' असंही राऊत म्हणाले.
    Published by:sachin Salve
    First published: