मुंबई, 11 नोव्हेंबर : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटकेत असणाऱ्या पत्रकार अर्णब गोस्वामी यांना अखेर जामीन मिळाला. मुंबई हायकोर्टाने जामीन फेटाळल्यानंतर गोस्वामी यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. तिथे त्यांना दिलासा मिळाला. मात्र असं असलं तरीही अर्णब गोस्वामी यांच्यासमोरील अडचणी अद्याप कमी झालेल्या नाहीत. कारण आणखी एका प्रकरणात त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.
रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक असलेल्या अर्णब गोस्वामी यांच्यावर महिला पोलीस अधिकाऱ्याला जखमी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलीस अर्णब यांना अटक करण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. मात्र यावेळी अर्णब यांनी पोलिसांना सहकार्य न करता त्यांच्याशी वाद घातला. तसंच एका महिला पोलिसाला जखमी देखील केलं, असा आरोप आहे. याप्रकरणी महिला पोलिसाच्या तक्रारीनंतर गोस्वामी यांच्याविरोधात पोलीस स्थानकात गुन्हाही नोंदवण्यात आला आहे.
महिला पोलिसाला जखमी केल्याप्रकरणीही अर्णब गोस्वामी यांना अटक होण्याची शक्यता असल्याने त्या प्रकरणातही अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी त्यांनी सेशन्स कोर्टात धाव घेतली आहे.
Republic TV Editor-in-Chief Arnab Goswami approaches sessions court in Mumbai seeking pre-arrest bail in case registered against him by Mumbai Police for allegedly assaulting woman police officer
— Press Trust of India (@PTI_News) November 11, 2020
अर्णब गोस्वामी यांना जामीन देताना सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं आहे?
सुप्रीम कोर्टाने सुनावणीदरम्यान महाराष्ट्र सरकारला सल्ला दिला आहे. महाराष्ट्र सरकारनं अर्णब गोस्वामी यांच्या टीव्हीवरील वक्तव्याकडे दुर्लक्ष करायला हवं, असं न्यायाधीक्ष चंद्रचूड यांनी सांगितलं. मी अर्णब गोस्वामी यांची वाहिनी पाहत नाही. त्यांचा विचार देखील वेगळा असू शकतो. न्यायालयात अभिव्यक्ती स्वातंत्र्याला महत्त्व आहे, ही पद्धत योग्य नाही, असं मतही सुप्रीम कोर्टानं व्यक्त केलं आहे.