चेंबूरमध्ये फ्लायओव्हरच्या दुरुस्तीच्या कामामुळे मुंबईत वाहतूक कोंडी

चेंबूरमध्ये फ्लायओव्हरच्या दुरुस्तीच्या कामामुळे मुंबईत वाहतूक कोंडी

  • Share this:

11 एप्रिल : चेंबूरजवळच्या अमर महल फ्लायओव्हरचे काही सांधे निखळल्याने हा पूल शनिवारी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यामुळे या मार्गावर तसंच ईस्टर्न आणि वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागत आहे. रविवारी नियमित वाहतूक करणारी वाहने नसल्याने इथे विशेष कोंडी नव्हती, मात्र सोमवारीपासून वाहनाची गर्दी झाल्याने इथे खूप मोठी वाहतूक कोंडी निर्माण होतेय.

पुलाची दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत ही वाहतूक कोंडी कायम राहण्याची भीती आहे. याचा फटका बसतोय तो ठाणे, नवी मुंबई आणि पुण्याकडे जाणाऱ्यांना.. संध्याकाळी पीक आवरच्या वेळी तर वाहनांच्या 4 ते 5 किलोमीटरच्या रांगा लागतायेत. या फ्लायओव्हरवर दोन भाग जोडणारे नटबोल्ट सैल झाले आहेत. त्याचं दुरुस्तीचं काम चाललंय. त्यामुळे पुलाची एक बाजू बंद आहे. हे काम कधी पूर्ण होईल हे सांगण्यात येत नाहीय.  पर्यायी रस्ते वापरायलं गेलं तर तिथेही कोंडी आहे.

वाहनांसाठी पर्यायी मार्ग

अमर महल पूल वाहतूकीसाठी बंद करण्यात आल्याने वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांनी वाहनांना खालील पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

  • वडाळा फ्री वे छेडा नगर मार्गे
  • सांताक्रूज – चेंबूर जोड रस्ता छेडा नगर मार्गे
  • सुमन नगर – चेंबूर नाका, मानखुर्द छेडा नगर मार्गे
  • सुमन नगर – चेंबूर नाका, गोवंडी छेडा नगर मार्गे
  • सायन धारावी – एलबीएस मार्ग ते घाटकोपर – अंधेरी जोड रस्ता

First published: April 11, 2017, 10:15 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading