VIDEO Clips बाबत रेणू शर्माच्या वकिलाचा धक्कादायक खुलासा; धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढणार?

VIDEO Clips बाबत रेणू शर्माच्या वकिलाचा धक्कादायक खुलासा; धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढणार?

येत्या काळात धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

  • Share this:

मुंबई, 14 जानेवारी : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री यांनी सोशल मीडियावरुन दुसऱ्या महिलेसोबत असलेल्या नात्याचा खुलासा केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. रेणू शर्मा नामक एका महिलेने मुंडेंवर बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे विरोधकांच्या हातात आयतं कोलीत मिळाल्याने मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. दरम्यान मुंडेंनी हा आरोप चुकीचे असल्याचे सांगत पैशांसाठी ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न असल्याची भावना व्यक्त केली आहे. (Renu Sharmas lawyers shocking revelation about VIDEO Clips Dhananjay Munde)

दरम्यान आरोप करणाऱ्या महिलेचे वकील रमेश त्रिपाठी यांनी माध्यमांशी बोलताना एक धक्कादायक बाब व्यक्त केली आहे. तक्रार दाखल करुन चार दिवस उलटले तरी अद्याप ओशिवारा पोलिसांनी कारवाई केली नसल्याचं त्यांनी सांगितलं. रेणू शर्मा यांच्यावर ब्लॅकमेल केल्याचा चुकीचा आरोप लावला जात आहे. माझी अशील अत्यंत सर्वसाधारण घरातील असून ती महिन्याला 10 ते 12 हजार रुपये भाडं भरुन पेइंग गेस्ट म्हणून राहत नाही. तिच्याकडे प्रॉपर्टी नाही किंवा घरही नाही, असे रमेश त्रिपाठी यांनी सांगितलं.

हे ही वाचा-राजकीय प्रेमप्रकरणं आणि बरचं काही; धनंजय मुंडेंप्रमाणे कोणते नेते होते चर्चेत?

रेणू शर्मा यांना दोन वेळचं जेवणं मिळणं अवघड आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून त्या दागिने विकून पोट भरत आहेत. त्यांच्यावर केलेला ब्लॅकमेलिंगचा आरोप पूर्णपणे खोटा आहे. मुंडेंविरोधातील गुन्हा सिद्ध करण्यासाठी आमच्याकडे बरेच पुरावे आहेत. (Renu Sharmas lawyers shocking revelation about VIDEO Clips Dhananjay Mundes) सध्या तपास सुरू असल्याने ते पुरावे मी उघड करू शकत नसल्याचे वकिलांनी सांगितलं. त्यातही VIDEO CLIPS बाहेर आल्यानंतर सर्वांचे तोंड बंद होतील, असेही ते म्हणाले. सध्या तपास सुरू असल्या कारणाने काही गोष्टी उघड करू शकत नसल्याचे रेणू शर्माच्या वकिलांनी सांगितले.

Published by: Meenal Gangurde
First published: January 14, 2021, 6:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading