Home /News /mumbai /

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंना खंडणीसाठी धमकी, आरोपी रेणू शर्माची शनिवारपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंना खंडणीसाठी धमकी, आरोपी रेणू शर्माची शनिवारपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी

धनंजय मुंडे (फाईल फोटो)

धनंजय मुंडे (फाईल फोटो)

Dhananjay Munde: मंत्री धनंजय मुंडे यांना खंडणीसाठी धमकावल्या प्रकरणात आरोपी रेणू शर्मा हिला अटक करण्यात आली आहे.

मुंबई, 21 एप्रिल : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना धमकावत खंडणी मागितल्या प्रकरणात रेणू शर्मा (Renu Sharma) या महिलेला अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) गुन्हे शाखेच्या युनिट 2 ने ही कारवाई केली आहे. अटक केल्यानंतर रेणू शर्मा यांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी म्हणजेच 23 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी (Renu Sharma sent to 3 days police custody) सुनावली आहे. धनंजय मुंडे यांना एका महिलेने धमकावत 5 कोटी रुपयांची खंडणी (extortion) मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. या वृत्ताने एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी मुंबईतील मलबार हिल पोलीस ठाण्यात (Malabar hill police station Mumbai) तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी रेणू शर्मा या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तपास केला असता ज्या मोबाइल वरुन कॉल येत होता तो आंतरराष्ट्रीय नंबर असला तरी तो इंदूर येथून ऑपरेट होत असल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी इंदूर येथून रेणू शर्माला अटक केली. रेणू शर्मा हिने धनंजय मुंडे यांना पाच कोटी रुपये, दुकान आणि फोन देण्याची धमकी देत होती, असा आरोप आहे. वाचा : "5 कोटी द्या नाही तर बलात्काराची तक्रार करेन" मंत्री धनंजय मुंडेंना खंडणीसाठी धमकी काय आहे प्रकरण? मिळालेल्या माहितीनुसार, रेणू शर्मा या महिलेने धनंजय मुंडे यांच्याकडून 5 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे. जर पैसे दिले नाहीत तर बलात्काराची तक्रार दाखल करेन अशी धमकी या महिलेने दिली आहे. या महिलेने आंतरराष्ट्रीय फोन क्रमांकावरुन धनंजय मुंडे यांना फोन करुन धमकी दिली. वारंवार या महिलेकडून फोन कॉल येऊ लागले, त्यासोबतच या महिलेने मंत्री धनंजय मुंडे यांना धमकावत म्हटलं की, 5 कोटी आणि महागडा मोबाइल दिला नाही तर सोशल मीडियात बदनामी सुद्धा करेन. यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी या महिलेच्या विरोधात मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित महिलेच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला. दीड ते दोन वर्षांपासून त्रास - धनंजय मुंडे या प्रकरणात धनंजय मुंडे यांनी म्हटलं, गेल्या दीड ते दोन वर्षांपासून हा त्रास होतोय. त्यांनी खोटी तक्रार माझ्या विरुद्ध केली. ती तक्रार परत मागे घेतली. काही दिवसांपासून जो त्रास होता तो मी सहन करत होतो. शेवटी सहनशीलता संपली आणि मला पोलिसांमध्ये तक्रार द्यावी लागली. या पुढे जे काही करतील ते पोलीस करतील असं म्हणून धनंजय मुंडे यांनी पाच कोटीचा खंडणी प्रकरणी तक्रार दिल्यानंतर प्रतिक्रिया दिली.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Crime, Dhananjay munde, Mumbai

पुढील बातम्या