अंगणवाडी सेविकांवरचा मेस्मा रद्द करा;शिवसेनेची विधानसभेत मागणी

दरम्यान मेस्मा कायद्यासंदर्भात विरोधी पक्षांचं म्हणणं ऐकून घ्यायला आणि बैठक घ्यायला आपण तयार असल्याचं महिला बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सभागृहात सांगितलं

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Mar 21, 2018 05:10 PM IST

अंगणवाडी सेविकांवरचा मेस्मा रद्द करा;शिवसेनेची विधानसभेत मागणी

21 मार्च: अंगणवाडी सेविकांना लागू केलेला मेस्मा रद्द करण्याच्या मागणीसाठी शिवसेना सदस्य आक्रमक झालेत. त्यामुळे सभागृहाचं कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं होतं.

काही दिवसांपूर्वी अंगणवाडी सेविका निवृत्तीचं वय 60 वरून 65 करावं या कारणासाठी संपावर गेल्या होत्या. सरकारनेही अंगणवाडी सेविकांची मागणी अखेर मान्य केली पण संप काळात त्यांच्यावर मेस्मा कायदा लागू करण्यात आला. या कायद्याअंतर्गत अंगणवाडी सेविका संपावर गेल्या म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊ शकतात तसंच प्रसंगी त्यांना अटकही होऊ शकते. इतकंच नाही तर संपाच्या दिवसातील कामाची भरपाईही त्यांना दिली जाणार नाही.

अत्यंत तोकड्या पगारावर काम करणाऱ्या, खेडोपाडी प्रसंगी महिलांना प्रसुतीत मदत करणाऱ्या या महिलांवर मेस्मा लावणं अन्याय्य आहे अशी शिवसेना आणि इतर विरोधी पक्षांची भूमिका आहे.

याचसाठी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिवसेनेनेही हा कायदा काढण्याची मागणी लावून धरली. तसंच ते आक्रमक झाल्यामुळे विधानसभेत गदारोळ झाला.

दरम्यान मेस्मा कायद्यासंदर्भात विरोधी पक्षांचं म्हणणं ऐकून घ्यायला आणि बैठक घ्यायला आपण तयार असल्याचं महिला बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सभागृहात सांगितलं. एखादा कायदा तात्काळ रद्द करण्याची मागणी करणं चुकीचं असल्याचंही त्या म्हणाल्या. ' आम्ही हा विषय संवेदनशील पद्धतीने हाताळला. संपामुळे कुपोषित बालकं मेली तर तुम्ही जबाबदारी घेणार का?' असा सवालही पंकजा मुंडे यांनी विरोधकांना केलाय.

Loading...

काय म्हणाल्या पंकजा मुंडे

- मेस्मा कायद्यासंदर्भात मत वाजत करण्यासाठी मी तयार आहे

-विरोधी पक्षांचं म्हणणं ऐकून घ्यायला तयार,बैठक करायला तयार

- एखादा कायदा तात्काळ रद्द करण्याची मागणी करणं चुकीचं

- आम्ही संवेदनशीलपणे विषय हाताळला

- कुपोषणग्रस्त मुलांसाठी आहार देणं फूड राइट्स ऍक्ट मार्फत बंधनकारक आहे

- आम्ही यासाठी बांधील आहोत

- संपामुळे कुपोषित बालकं मेली तर तुम्ही जबाबदारी घेणार का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 21, 2018 04:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...