पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, परीक्षा पुढे ढकलण्याची ठाकरे सरकारची घोषणा
पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, परीक्षा पुढे ढकलण्याची ठाकरे सरकारची घोषणा
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले आहे. पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मोठी घोषणा केली आहे.
मुंबई, 31 जुलै : कोकण (kokan floods) आणि रायगडमध्ये अतिवृष्टी आणि दरडी कोसळून होत्याचं नव्हतं झालं आहे. अनेकांचे संसार हे उघड्यवर पडले असून जनजीवन ठप्प झाले आहे. वीज बिलापाठोपाठ आता आपतीग्रस्त भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना ठाकरे सरकारने दिलासा दिला आहे. या भागातील परीक्षा (exam) पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (udaya samant) यांनी केली आहे.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले आहे. पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मोठी घोषणा केली आहे. पूरग्रस्त आणि दरड दूर्घटनाग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही. आपत्तीग्रस्तं भागातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहे. याबद्दल सर्व विद्यापीठांना आदेश दिले आहे, अशी माहिती सामंत यांनी दिली.
'मांस, मच्छी, मटणापेक्षा बीफ जास्त खा'; भाजप मंत्र्यांचा नागरिकांना सल्ला
त्यामुळे पूरग्रस्त भागातील विद्यापीठांमधील परीक्षा या पुढे ढकलण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या भागातील परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतर परीक्षेचा निर्णय घेतला जाणार आहे.
दरम्यान, सांगली दौऱ्यावर असताना ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी पुरबाधित भागात कसलीही वीज बिलाची वसुली करू नये, असे आदेश दिले. राज्यात ज्या ज्या भागात पूरस्थिती होती आशा भागातील वीज कनेक्शन तातडीने सुरू करण्याचे आदेश देण्यात आले असून पुरबाधित भागातील ग्राहकांची वीज बिलाची वसुली करू नका, असे आदेशही देण्यात आले.
तसंच, पुढील निर्णय होईपर्यंत विजबिलाबाबत कसलीही सक्ती करू नये, असेही प्रशासनाला आदेश देण्यात आले आहेत. पुरबाधित भागातील वीजबिल माफी करण्याचा अधिकार मंत्रिमंडळाला असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.