Home /News /mumbai /

नारायण राणेंना मोठा दिलासा, बंगल्यावर तुर्तास कारवाई न करण्याचे कोर्टाचे आदेश

नारायण राणेंना मोठा दिलासा, बंगल्यावर तुर्तास कारवाई न करण्याचे कोर्टाचे आदेश


नारायण राणे यांच्या मुंबईतील जुहू इथं Adhish नावाचा बंगला आहे. या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याच्या अनेक तक्रारी

नारायण राणे यांच्या मुंबईतील जुहू इथं Adhish नावाचा बंगला आहे. या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याच्या अनेक तक्रारी

नारायण राणे यांच्या मुंबईतील जुहू इथं Adhish नावाचा बंगला आहे. या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याच्या अनेक तक्रारी

मुंबई, 21 मार्च : मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यामध्ये चांगलाच वाद पेटला आहे. मुंबई महापालिकेने (BMC) केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना बंगल्याबाबत नोटीस पाठवून कारवाईचा इशारा दिला होता. पण पाठवली.  पण, आता हायकोर्टाने नारायण राणे यांना दिलासा दिला आहे. राणेंच्या बंगल्यावर तुर्तास कारवाई न करण्याचे आदेश कोर्टाने मुंबई पालिकेला दिले आहे. नारायण राणे यांच्या मुंबईतील जुहू इथं Adhish नावाचा बंगला आहे. या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे मुंबई पालिकेनं दोन वेळा राणेंच्या बंगल्याची पाहणी केली होती. त्यानंतर नारायण राणे यांच्या बंगल्याला मुंबई महापालिकेनं नोटीस बजावली होती. नारायण राणेंनी या नोटीशीविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. हायकोर्टाने राणेंची याचिका निकाली काढली आहे. (तीन आरोपी 3 वर्षांपासून होते फरार; एकाच रात्रीत झाला गेम ओव्हर, नांदेडातील घटना) मुंबई पालिकेनं नारायण राणे याांच्या बंगल्यावर कारवाई बाबत पाठवलेल्या नोटीशीवर तुर्तास कोणतीही कारवाई नको, असे निर्देश कोर्टाने मुंबई पालिकेला दिले आहे. तसंच, निकाल नारायण राणेंच्या विरोधात गेल्यास त्यावर तीन आठवडे कारवाई न करू नये आणि निकालाविरोधात कारवाई झाल्यास पुन्हा दाद मागण्याचा पर्याय राणेंकडे उपलब्ध असणार आहे. त्यामुळे राणेंच्या बंगल्यावर कारवाई तुर्तास टळली आहे. काय आहे प्रकरण? नारायण राणे यांच्या मुंबईतील जुहू इथं Adhish नावाचा बंगला आहे. या बंगल्याबाबत अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार होती. तारा रोडवर उभारण्यात आलेल्या या बंगल्याच्या बांधकामांमुळे सीआरझेड नियमांचे उल्लंघन होत असल्याची तक्रार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या के पश्चिम विभागाच्या बिल्डिंग प्रपोजल विभागाचं पथकाने १८ फेब्रुवारी रोजी नारायण राणे यांच्या अधिश बंगल्यात जाऊन तपासणी केली आणि नोटीसही बजावली. आरटीआय कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी या संदर्भात तक्रार केली होती. माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी नारायण राणे यांच्या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाले असल्याची तक्रार यापूर्वीच मुंबई मनपाला केली होती. मात्र, आपल्या या तक्रारीनंतर कुठलीच कारवाई केली नसल्याचा आरोप संतोष दौंडकर यांनी केला होता. त्यानंतर आता मुंबई मनपाने नारायण राणे यांच्या बंगल्याची तपासणी करण्यासाठी नोटीस बजावली. मुंबई महानगरपालिका कायदा 1888 अंतर्गत सेक्शन 488 नुसार बीएमसीने केंद्रीय मंत्री नारायण राणेंना ही नोटीस पाठवण्यात आली होती. (तुमचं Facebook Account हॅकर्सपासून सुरक्षित ठेवण्यासाठी या 5 गोष्टी कराच) संतोष दौंडकर यांनी आरोप केला आहे की, नारायण राणे यांच्या जुहू येथील अधिश बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाले आहे. तसेच कोस्टर रेग्युलेशन झोन (सीआरझेड) Coastal Regulations Zone नियमांचे उल्लंघन करुन हा बंगला बांधण्यात आला असल्याची तक्रारही त्यांनी केली होती. सीआरझेड नियमांचे उल्लंघन करत समुद्रापासून 50 मीटर परिसरात हा बंगला बांधण्यात आला असल्याचंही संतोष दौंडकर यांनी म्हटलं होतं.
Published by:sachin Salve
First published:

Tags: BMC, Mumbai high court, Narayan rane

पुढील बातम्या