कोरोनाच्या लढाईत रिलायन्सकडून VIDEO लाँच , कोरोना वॉरियर्सना केला सलाम

कोरोनाच्या लढाईत रिलायन्सकडून VIDEO लाँच , कोरोना वॉरियर्सना केला सलाम

Coronavirus विरोधातल्या लढ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मदतीची घोषणा केल्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजने मदतीचा हात पुढे केला.

  • Share this:

मुंबई, 17 मे : देशभरात कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी सर्वजण एकत्र आले आहेत. आरोग्य सेवा, पोलीस यांच्यासोबतच अनेक स्रोत या लढाईमध्ये मोलाची भूमिका बजावत आहेत. रिलायन्स फाऊंडेशनचाही या महासंकटात मोलाचा वाटा आणि महत्त्वाची भूमिका बजावत आहे. रिलायन्स फाऊंडेशननं कोरोना वॉरियर्सला आणि भारतीयांच्या भावनांना सलाम करण्यासाठी एक व्हिडीओ तयार केला आहे. आपण सर्वजण एकत्र येऊन कोरोनाविरुद्धची ही लढाई जिंकू असं नीता अंबानी यांनी या व्हिडीओमधून विश्वास व्यक्त केला आहे.

रिलायन्स लाइफ सायन्स टीमनं भारतातील सर्वात मोठी कोरोना टेस्ट लॅब तयार केली आहे. या लॅब अंतर्गत दरदिवशी साधारण 3500 चाचण्या केल्या जातात. याशिवाय रिलायन्सनं भारतात पहिलं कोरोनाग्रस्तांसाठी विशेष रुग्णालय उभं केलं आहे.

Coronavirus विरोधातल्या लढ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मदतीची घोषणा केल्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजने मदतीचा हात पुढे केला. रिलायन्स इंडस्ट्रीजने PM Cares या फंडासाठी 500 कोटींची मदत केली आहे. महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांतल्या मुख्यमंत्री निधीसाठी रिलायन्सने प्रत्येकी 5 कोटी रुपये दिले आहेत.

याआधी कोरोनाशी लढा देण्यासाठी रिलायन्स जिओने MyJio Coronavirus Tool लॉंच केले आहे. याच्या मदतीने तुम्ही घरच्या घरी कोरोनाच्या लक्षणांची माहिती मिळवू शकता. हे टूल तुम्ही MyJio अॅपसह Jio.comया वेबसाईटवरही वापरू शकता. यामध्ये अंतर्ज्ञानी टूलच्या मदतीने काही प्रश्नांची उत्तरे देऊन तुम्हाला मूल्यांकन देण्यात येईल. त्यांनतर तुमच्या स्थितीचे निदान केले जाणार आहे.

हे वाचा-Reliance Jio ला चौथ्या तिमाहीत मोठा फायदा, नफ्यात 177 टक्यांची वाढ

हे वाचा-मोठी अमेरिकन कंपनी करणार JIOमध्ये 5655 कोटींची गुंतवणूक,वाचा महत्त्वाचे 5 मुद्दे

संपादन- क्रांती कानेटकर

First published: May 17, 2020, 9:12 AM IST

ताज्या बातम्या