मुंबई, 05 जुलै : रिलायन्स इंडस्ट्रीच्या 41व्या एजीएममध्ये गीगा फायबर लाँच केलाय. यामध्ये ग्राहकांना स्वस्त दरात फास्ट इंटरनेट सेवा उपलब्ध होईल. 15 आॅगस्टपासून याचं रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे. याशिवाय रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी म्हणाले, जिओच्या ग्राहकांची संख्या दुप्पट झालीय. जिओ देशातल्या 99 टक्के जनतेपर्यंत पोचवण्याचं लक्ष्य रिलायन्सचं असेल. प्रत्येक गाव, शहरात जिओ पोचवण्याचं काम केलं जातंय.
#RILAGM | Mukhesh Ambani says largest ever cycle of investment in hydrocarbon biz is nearly complete pic.twitter.com/rcn7I6SYE4
— CNBC-TV18 (@CNBCTV18Live) 5 July 2018
प्रत्येक महिन्यात 240 कोटींचा gb डाटा वापरला जातोय. रिलायन्स जिओचे 22 कोटी ग्राहक असल्याचं अंबानी म्हणाले.
हेही वाचा
हेमंत करकरे यांच्या मृत्यूवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Reliance AGM 2018 :असा आहे जिओचा नवा फोन !
मुकेश अंबानी म्हणाले, रिलायन्सची गेली 10 वर्ष शानदार गेलीयत. रिलायन्सच्या नफ्यातही बदल झालाय. रिलायन्स सर्वात मोठा करदाता ठरलाय. 2017-18मध्ये कंपनीचा नफा 20.6 टक्क्यांनी वाढून 36076 कोटी झालाय. कंपनीचा फोकस कंझ्युमर कारभारावरही आहे.
(डिस्क्लोजर : news18lokmat.com हा नेटवर्क 18 मीडिया आणि इन्व्हेस्टमेंट लिमिटेडचा भाग असून या कंपनीची मालकी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची आहे. रिलायन्स जिओसुद्धा याच कंपनीचा भाग आहे)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Broadband, Mukesh ambani, Reliance Jio