LIVE NOW

#RIL40 : रिलायन्स जगातील टाॅप 20 कंपन्यांमध्ये सहभागी होऊ शकते आणि होणारच -मुकेश अंबानी

Lokmat.news18.com | December 24, 2017, 12:01 AM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated December 24, 2017
auto-refresh

Highlights

11:54 pm (IST)

कार्यक्रमाच्या शेवटी रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी आपलं व्हिजन सांगितलं.


1. रिलायन्स जगातली टाॅप 20 कंपन्यांमध्ये सहभागी होऊ शकते आणि होणारच !

2. येणाऱ्या काळात जग फाॅसिल इंधनाच्या ऐवजी क्लीन, ग्रीन आणि रिन्यूबल एनर्जीवर भर दिला जाईल. भारतात रिलायन्स स्वच्छ आणि मुबलक ऊर्जा प्रदान करणारा उत्पादक होऊ शकतो.

3. आयुष्य आणखी सुकर करण्यासाठी येणाऱ्या काळात इनोव्हेटीव्ह न्यू मटेरियल्स बनवले जातील. रिलायन्स यामध्ये ग्लोबल लीडर म्हणून पुढे येईल.

4. जिओने आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या मदतीने डिजीटल क्रांती केलीये. जिओने भारतीय अर्थव्यवस्थेतील सर्व क्षेत्रांना सकारात्मक ऊर्जा दिलीये. जिओ या सर्व क्षेत्रात देशाला भक्कम करणारी पहिली कंपनी ठरेल.

5. देशाला ग्लोबल पाॅवर बनवण्यासाठी रिलायन्स देशातील नागरिक, छोटे व्यापारी यांना सशक्त पाठबळ देईल.

 

10:54 pm (IST)
9:17 pm (IST)

च्या सोहळ्यात शाहरुख खानची हजेरी


7:54 pm (IST)

ही एका कर्मयोगीची संकल्पना होती, ती आज साकार झाली आहे. एक विचार आज साम्राज्यात बदलेला आहे -


Load More
23 डिसेंबर :रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) कंपनी आपला 40 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. नवी मुंबईत सुरू असलेल्या कार्यक्रमात रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी धीरूभाई अंबानी यांच्या आठवणींना उजाळा दिलाय. रिलायन्स ही एका व्यक्तीच्या दुरदृष्टीचा परिणाम असून त्यांनी पाहिलेलं छोटं स्वप्न आज एक साम्राज्य बनललं आहे असे गौरद्गार मुकेश अंबानी यांनी काढले. आज रिलायन्स इंटस्ट्रीज लिमिटेडने 40 वर्षांचा प्रवास पूर्ण केला. नवी मुंबईत मोठ्या उत्साहात 40 वा वर्धापन दिन साजरा होत आहे. यावेळी मुकेश अंबानी यांनी वडील धीरूभाई अंबानी यांच्या आठवणींना उजाळा दिला. माझे वडील आणि आमचे फाउंन्डर धीरुभाई अंबानी यांच्या दुरदृष्टीमुळे रिलायन्स आज एक विशाल साम्राज्य म्हणून समोर आलंय. मागील 40 वर्षांत आम्ही जे यश मिळवलंय ते फक्त त्यांच्यामुळे शक्य झालंय. रिलायन्स त्यांच्या खांद्यावर उभी राहिली आहे असं यावेळी मुकेश अंबानी म्हणाले. एका कर्मचाऱ्यापासून सुरू झालेली कंपनी आज 2.5 लाख कर्मचाऱ्यांचं कुटुंब आहे. सुरुवातील एक हजार रुपयांपासून सुरू झालेली कंपनी आज 6 लाख कोटींची झाली आहे. रिलायन्स आज एक शहरापासून आता 28 हजार शहरं आणि 4 लाख गावांपर्यंत पोहोचली असंही अंबानी म्हणाले. असा सुरू झाला रिलायन्सचा प्रवास 28 डिसेंबर 1932 मध्ये गुजरातच्या जुनागढ जिल्ह्यातील चोरवाड गावात जन्मलेले धीरूभाई अंबानी यांची मोठी स्वप्नं होती. पण घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे त्यांनी शालेय शिक्षण सोडून भजे विकण्यास सुरुवात केली. हा त्याचा पहिला व्यवसाय होता. रिलायन्सची स्थापना 1९४९ साली धीरूभाई नोकरीच्या शोधात एडन इथं गेले. तेथे बर्मा शेल कंपनीची उपकंपनी म्हणून काम करणार्‍या ए. बेस नावाच्या कंपनीत धीरूभाई मासिक ३०० रुपये पगारावर पेट्रोल पंपावर नोकरी करू लागले. आठ वर्ष तिथे काम केल्यानंतर 1958 ला धीरूभाईंनी जमा केलेले 500 रुपये घेऊन भारतात परतले. इथं आल्यावर त्र्यंबकलाल चंदरजी दामाणी यांच्यासोबत टेक्साटईल आणि ट्रेडिंग कंपनीची सुरुवात केली. त्यानंतर 1960 मध्ये त्यांनी रिलायन्सची स्थापना केली. आज आहे देशातील सर्वात मोठी कंपनी आज रिलायन्स इंडस्ट्रीज देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. देशाविदेशासह अनेक ठिकाणी रिलायन्सचं वर्चस्व आहे. देशाच्या जीडीपीवरही रिलायन्सची छाप आहे.
corona virus btn
corona virus btn
Loading