मुंबई, 01 नोव्हेंबर: भारतातील नामांकित कंपनी Reliance कडून नुकतीच एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. रिलायन्स द्वारे अनावरण केलेला प्रीमियम शॉपिंग मॉल जिओ वर्ल्ड ड्राइव्ह (Jio World Drive) मुंबईतील ग्राहकांना जागतिक दर्जाचा रिटेल अनुभव देण्यासाठी सज्ज आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता ग्राहकांना नेहमीच सुखद धक्के देणाऱ्या रिलायन्सनं अजून एक आनंदाची घोषणा केली आहे. सर्वोत्कृष्ट जागतिक अनुभव भारतात आणण्याच्या आणि शोकेस करण्याच्या दृष्टीकोनातून आता रिलायन्सनं Jio Drive-in theatre प्रथमच भारतात आणण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे 5 नोव्हेंबर रोजी हे लोकांसाठी खुलं होणार आहे.
जगभरातील सर्वोत्कृष्ट रिटेल आणि मनोरंजनचा अनुभव भारतातील लोकांनाही यावा यासाठी रिलायन्सनं हे पाऊल उचललं आहे. "मुंबई हे फक्त एक ब्रँड किंवा ठिकाण नाही तर संपूर्ण नवीन जग आहे त्यामुळे आम्ही सतत या प्रयत्नात आहोत की असे अनुभव ग्राहकांना मिळावेत जे त्यांना भुरळ घालतील आणि त्यांना गुंतवून ठेवतील. जिओ ड्राइव्ह- थिएटरच्या (Jio Drive-in theatre) माध्यमातून आम्ही असंच काही नवीन आणि भन्नाट मुंबईकरांच्या भेटीला जाणार आहोत" असं रिलायन्स रिटेलच्या डायरेक्टर इशा अंबानी (Ms. Isha Ambani) यांनी म्हंटलं आहे.
आजकाल लोकांचा कल हा विंडो शॉपिंगसोबतच खरेदीमधील इतरही बाबींकडे जाऊ लागला आहे. कुठेही खरेदीला जाताना त्या ठिकणी सर्व प्रकारची सोय असावी आणि सुखद अनुभव मिळावा अशी इच्छा लोकांची असते. त्यामुळे लोकांना वर्ल्ड क्लास अनुभव देण्यासाठी जिओ वर्ल्ड ड्राइव्ह (JWD) ची संकल्पना पुढे आली असं इशा अंबानी सांगतात. त्यामुळे या मॉलमध्ये उत्तम रिटेल शॉप्ससह इतरही बऱ्याच भन्नाट गोष्टी असणार आहे. चला तर मग जाणून घेऊया.
Facebook चं नाव बदलल्यानं WhatsApp चं बदलणार लूक? WhatsApp वर काय होणार परिणाम? वाचा
मनोरंजन
5 नोव्हेंबर रोजी JWD हे भारतातील पहिलं (India's first open air theatre) ओपन-एअर रूफटॉप थिएटर सुरु करण्यात येणार आहे. Jio Drive-in-theatre असं त्याचं नाव असणार आहे. जे PVR द्वारे संचालित केलं जाणार आहे. Jio Drive-in ची क्षमता 290 कार मावतील उत्की मोठी असणार आहे. तसंच ही मुंबईतील सर्वात मोठी सिनेमा स्क्रीनअसणार आहे. लोक यामध्ये स्वतःच्या कारमधूनच सिनेमा बघू शकणार आहेत. लोकांना ओपन एअर अतुलनीय सिनेमॅटिक अनुभव देण्यासाठी Jio Drive-in-theatre सज्ज असणार आहे. विशेष म्हणजे ही संपूर्ण भारतातील सर्वात पहिली भन्नाट संकल्पना असणार आहे.
The Bay’s Club
JWD हे मुंबईतील सर्वात खास खाजगी सदस्य क्लब असणार आहे. The Bay’s Club असं या क्लबचं नाव असणार आहे. प्रगत क्रीडा आणि ऍथलेटिक सुविधांनी युक्त, बे क्लब हे त्यापैकी एक आहे शहरातील उत्कृष्ट क्रीडा आणि मनोरंजन कॉर्पोरेट जीवनशैलीला अधिक उत्तम बनवण्यासाठी The Bay’s Club असणार आहे.
Food आणि Beverage सुविधा
भारतातील काही नामवंत आणि एक्सपर्ट लोकांसोबत मिळून JWD मध्ये Food आणि Beverage ची सुविधा असणार आहे. भारतातील आणि भारताबाहेरील उत्कृष्ट Food आणि Beverage चा आनंद लोकांना इथे घेता येणार आहे.
कला
भारतातील कलाकार हे जगभरात भारताची प्रतिष्ठा वाढवत आहेत. म्हणूनच अशा कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि लोकांना सर्व प्रकारच्या कलांसोबत अवगत करून देण्यासाठी एका ब्रँडची कल्पना केली आहे जी नवीन कल्पनांच्या संस्कृतीचं रक्षण करेल. कलेसाठी सर्वसमावेशक जागा तयार केली आहे, ती सहभाग आणि संवादासाठी खुली असणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Reliance Jio