• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • गरिबांच्या लसीकरणासाठी रिलायन्स फाउंडेशनचा पुढाकार, पालिकेच्या साथीनं मुंबईत 3 लाख मोफत लसी

गरिबांच्या लसीकरणासाठी रिलायन्स फाउंडेशनचा पुढाकार, पालिकेच्या साथीनं मुंबईत 3 लाख मोफत लसी

मुंबई आणि परिसरातील (Mumbai and suburbs) गरीब आणि गरजू नागरिकांसाठी (underprevilaged communities) रिलायन्स फाउंडेशन (Reliance Foundation) 3 लाख लसींचा (3 lakh vaccines) पुरवठा करणार आहे.

 • Share this:
  मुंबई, 2 ऑगस्ट : मुंबई आणि परिसरातील (Mumbai and suburbs) गरीब आणि गरजू नागरिकांसाठी (underprevilaged communities) रिलायन्स फाउंडेशन (Reliance Foundation) 3 लाख लसींचा (3 lakh vaccines) पुरवठा करणार आहे. सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल (Sir H. N. Reliance Foundation Hospital) आणि एमसीजीएम (Municipal Corporation of Greater Mumbai) यांच्या संयुक्त मोहिमेतून मुंबई आणि परिसरातील गरीबांपर्यंत लसीकरणाची सुविधा पोहचवली जाणार आहे. मुंबईतील वेगवेगळ्या 50 भागांमध्ये लसीकरणाची ही सुविधा पुरवली जाणार आहे. रिलायन्स फाउंडेशनने दिलेल्या माहितीनुसार मोफत लसीकरणाची ही सुविधा धारावी, वरळी, वडाळा, कुलाबा, प्रतिक्षा नगर, कामाठीपुरा, मानखुर्द, चेंबुर, गोवंडी आणि भांडूप या भागात पुरवली जाणार आहे. या उपक्रमासाठी रिलायन्स फाउंडेशनच्या वतीनं लसी पोहोचवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वाहनांची जबाबदारी घेण्यात येईल, तर पालिका आणि बेस्ट यांच्या वतीनं इतर पायाभूत सुविधा आणि आवश्यक साधनं यांचा पुरवठा केला जाणार आहे. मिशन व्हॅक्सिन सुरक्षा रिलायन्स फाउंडेशनच्या ‘मिशन व्हॅक्सिन सुरक्षा’ या उपक्रमाचाच हा भाग असून मुंबईप्रमाणेच संपूर्ण देशभरात हा कार्यक्रम राबवला जाणार आहे. मोफत लस कुठंय? खासगी रुग्णालयांकडे साठा पडून, सरकारी केंद्रांवर मात्र खडखडाट मुंबईत पुढच्या तीन महिन्यात 3 लाख लसीकरणाचं उद्दिष्ट पूर्ण केलं जाणार असल्याची माहिती रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्ष नीता अंबानी यांनी दिली आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत रिलायन्स फाउंडेशन सक्रीय असून जास्तीत जास्त नागरिकांचं लसीकरण हेच या मोहिमेचं उद्दिष्ट असल्याचं नीता अंबानी यांनी सांगितलं. लस हीच सुरक्षा कोरोनाविरुद्धच्या लढाईत अधिकाधिक नागरिकांच्या लसीकरणाचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन रिलायन्स फाउंडेशननं लसीकरण मोहिमेत सक्रीय सहभाग घेतला आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट महाघातक, अमेरिकेकडून शिक्कामोर्तब सुरुवातीला रिलायन्स परिवारातील सर्व कर्मचाऱ्यांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं लसीकरण पूर्ण केल्यानंतर आता समाजातील विविध गरजू आणि गरीब घटकांच्या लसीकरणासाठी रिलायन्स फाउंडेशननं पाऊल उचललं आहे. यामुळे लवकरात लवकर सर्व भारतीयांचं लसीकरण पूर्ण कऱण्याच्या सरकारच्या हेतूला मदत होत असून लवकरात लवकर अधिकाधिक नागरिकांना लस मिळणं शक्य होणार आहे.
  Published by:desk news
  First published: