पेशंटच्या नातेवाईकांचा नायर हॉस्पिटलमध्ये राडा, 3 डॉक्टरांवर केला हल्ला

'अनेकदा डॉक्टरांनी संपही केले आहेत. त्यानंतर सरकारकडून मागण्या मान्य केल्या जातात. मात्र नंतर दुसरी घटना घडेपर्यंत त्या मागण्यांकडे लक्षंही दिलं जातं नाही.'

News18 Lokmat | Updated On: Jul 15, 2019 05:05 AM IST

पेशंटच्या नातेवाईकांचा नायर हॉस्पिटलमध्ये राडा, 3 डॉक्टरांवर केला हल्ला

मुंबई 15 जुलै : डॉक्टरांवर पेशंटच्या नातेवाईकांकडून होणाऱ्या हल्ल्यांच्या घटना थांबण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. आज पुन्हा मुंबईतल्या नायर हॉस्पिटलमध्ये एका पेशंटच्या नातेवाईकांनी तीन डॉक्टरांवर हल्ला करत त्यांना मारहाण केली आणि हॉस्पिटलमधल्या सामानाची तोडफोड केली.  हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असलेल्या एका पेशंटचा रविवारी मध्यरात्री मृत्यू झाला. त्यानंतर पहाटे त्या पेशंटचे नातेवाईक हॉस्पिटलमध्ये आले आणि त्यांनी राडा केला.

संतप्त झालेल्या नातेवाईकांनी कुठलंही कारण ऐकून न घेता डॉक्टरांवर हल्ले करायला सुरुवात केली. यात तीन डॉक्टरांना मारहाण झाली तर हॉस्पिटलमधल्या सामानांचीही त्यांनी तोडफोड केली. या घटनेमुळे डॉक्टरांमध्ये पुन्हा असंतोष निर्माण झालाय.  सरकारने तातडीने निवासी डॉक्टरांना संरक्षण पुरवावं अशी मागणी डॉक्टरांनी केली आहे. या नातेवाईकांनी फक्त एवढच केलं नाही तर डॉक्टरांना वाचविण्यासाठी पुढे आलेल्या सुरक्षा रक्षकांवरही हल्ले केले.

कृष्णा नदीपात्रात 12 फूट मगरीचा मृत्यू, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

डॉक्टरांना योग्य सुरक्षा पुरविल्याशीवाय काम करणं शक्य नसल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. या आधीही अनेकदा डॉक्टरांवर हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेकदा डॉक्टरांनी संपही केले आहेत. त्यानंतर सरकारकडून मागण्या मान्य केल्या जातात. मात्र नंतर दुसरी घटना घडेपर्यंत त्या मागण्यांकडे लक्षंही दिलं जातं नाही असा आरोप डॉक्टरांकडून केला जातोय. या प्रकरणी अग्निपाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

नवी मुंबई तिहेरी हत्याकांडाने हादरली, तुर्भे एमआयडीसीतील घटना

Loading...

खड्ड्यात पडून मुलाचा मृत्यू

वरळी परिसरात कोस्टल रोडसाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून एका 15 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आलं आहे. बबलू कुमार पासवान असं मृत्युमुखी पडलेल्या मुलाचं नाव आहे. बबलू हा महात्मा फुले नगर येथील रहिवासी होता. वरळी सी लिंक परिसरात समुद्रकिनारी खोदण्यात आलेल्या सुमारे 12 फूट खोल खड्ड्यात बबलू पडला.  ही बाब स्थानिकांच्या लक्षात आल्यानंतर त्याला खड्ड्यातून बाहेर काढण्यात आलं आणि तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 15, 2019 05:05 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...