Home /News /mumbai /

होय, करीमलाला इंदिरा गांधींना भेटायचा; नातवाने केला दावा

होय, करीमलाला इंदिरा गांधींना भेटायचा; नातवाने केला दावा

करीम लाला याचं खरं नाव अब्दुल करीम शेर खान असं होतं. सन 1911 मध्ये अफगानिस्तानात त्याचा जन्म झाला.

  विवेक गुप्ता, मुंबई 17 जानेवारी : एकेकाळी मुंबईच्या अंडरवर्ल्ड जगताचा दादा असलेल्या करीमलालाची भेट घ्यायला इंदिरा गांधी पायधुणीत येत होत्या. खासदार संजय राऊत यांनी हा दावा केला होता. त्यानंतर देशभर वादळ निर्माण झालं. त्यावर आता नव नवे खुलासे होत आहेत. या प्रकरणावरून काँग्रेसने आक्षेप घेतल्यानंतर संजय राऊत यांनी ते वक्तव्य मागे घेतलं होतं. इंदिरा गांधी यांच्याबद्दल आम्ही चुकीचं काहीही खपवून घेणार नाही असा इशारा काँग्रेसने दिला होता. त्यानंतर राऊतांनी माघार घेतली होती. आता करीमलाला यांचे नातू सलीम खान आणि जहानजेब खान यांनी यावर अधिक खुलासा केलाय. करीमलाला हे इंदिरा गांधी यांना अनेकदा भेटले असा दावा त्यांनी केलाय. जहानजेब खान म्हणाले, करीमलाला हे फक्त इंदिरा गांधी यांनाच नाही तर बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, राजीव गांधी यांच्यासह अनेक नेत्यांना भेटत असतं. करीमलाला यांचा अंडरलवर्ल्डही काहीही संबंध नव्हता. ते पठाणांचे नेते होते असंही त्यांनी सांगितलं. सरहद गांधी खान अब्दुल गफ्फार खान हे जेव्हा मुंबईत येत तेव्हा ते करीमलाला यांच्याकडे जात असे असंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

  फडणवीस CMअसताना अंडरवर्ल्ड डॉन त्यांना वर्षावर भेटला, थोरातांचा खळबळजनक आरोप

  कोण होता करीम लाला? करीम लालाने तस्करीच्या माध्यमातून अमाफ मालमत्ता कमवली होती. करीम लालाविषयी असं बोललं जातं की, त्याने खूप संपत्ती कमवली होती. काही प्रसंगी तो गरिब आणि गरजूंची आर्थिक मदतही करत होता. करीम लाला याने थोडक्यात आपली प्रतिमा 'रॉबिनहूड'सारखी केली होती. खरंतर हाजी मस्तान याला मुंबईचा पहिला डॉन समजलं जातं. मात्र करीम लालाचं हाजी मस्तानच्याही आधी मुंबईवर वर्चस्व होतं. करीम लालाची दहशत एवढी होती की त्याने दाऊद इब्राहिमला  मुंबईच्या रस्त्यांवर सळो की पळो करून सोडलं होतं. या घटनेची गुन्हेगारी जगतात आजही आठवण काढली जाते.

  संजय राऊतांची हकालपट्टी करा, भिडे गुरुजींची सांगली बंदचं आवाहन

  असे सांगितले जाते की, 'जंजीर' या चित्रपटात अभिनेता प्राण यांची 'शेर खान' ही भूमिका ही करीम लालावर आधारित होती. करीम लाला याला लोक शेर खान असंही संबोधत होते. चित्रपटातील प्राण यांची वेशभूषाही करीम लाला याच्यासारखीच होती. करीम लाला नेहमी सफेद पठानी सूट परिधान करत असे. 7 फूट उंच आणि भारदस्त व्यक्तीमत्व यामुळेच लोकांच्या मनात त्याच्याबद्दल भीती निर्माण होत असायची. कालांतराने तो आपल्यासोबत काठी ठेवायचा. करीम लालाने 50 ते 80 च्या दशकापर्यंत मुंबईवर राज्य केलं. करीम लाला ही अशी व्यक्ती होती की, त्याने मुंबईला 'डॉन' या शब्दाचा अर्थ सांगितला. करीम लालाच्या पठान गॅंगची संपूर्ण मुंबईभर दहशत होती.

  माझ्या निवृत्तीचा अनेकांचा प्लॅन होता पण..., शरद पवारांचा फडणवीसांना टोला

  करीम लाला आला होता अफगानिस्तानातून करीम लाला याचं खरं नाव अब्दुल करीम शेर खान असं होतं. सन 1911 मध्ये अफगानिस्तानात त्याचा जन्म झाला. तो पश्तून समाजातून होता. पश्तून समाजाचा शेवटचा राजा होता. वयाच्या 21 व्या वर्षी त्याने अफगानिस्तान सोडलं आणि तो मुंबईत आला. त्याच्या गुन्हेगारी विश्वाची सुरूवात जुगारापासून झाली. तो त्याच्या भाड्याच्या घरात जुगाराचा अड्डा चालवत होता. जुगार खेळणारांना उधारीवर पैसे देत होता.
  Published by:Ajay Kautikwar
  First published:

  Tags: Indira gandhi

  पुढील बातम्या