मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीला पाण्यातून खेचून काढलं; महिला पोलिसाला कडक सॅल्यूट, CP नीही केलं कौतुक

आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीला पाण्यातून खेचून काढलं; महिला पोलिसाला कडक सॅल्यूट, CP नीही केलं कौतुक

अक्सा बीचवर ही तरुणी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत होती. त्यात पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांची तातडीने कारवाई केली. पोलीस आयुक्तांनी या महिलेच्या धाडसाचं कौतुक केलं आहे

मुंबई, 6 जानेवारी : काही दिवसांपूर्वी नवी मुंबईतील एका मानसिक रुग्ण महिलेचा जीव वाचवण्यात पोलिसांना यश आलं. त्यानंतर आणखी एक तरुणीला महिला पोलिसांनी प्रसंगावधान राखल्यामुळे जीव वाचला आहे. पोलीस जवानांनी वेळेत समन्वय साधल्यामुळे या तरुणीचे प्राण वाचले आहेत.

भांडुप पोलीस ठाणे येथून मिळालेल्या माहितीच्या आधारे मालवणी पोलीस ठाण्याचे म.स.पो.नि अनिता कदम व पो.शि. चव्हाण यांनी प्रसंगावधान राखत स्वतः पाण्यात जाऊन आत्महत्येचा प्रयत्न करत असलेल्या मुलीचे प्राण वाचवले.

या मुलीचा एक व्हॉट्सअॅप चॅट समोर आला आहे. त्यामध्ये तिने आपल्या वडिलांना आत्महत्या करीत असल्याचं सांगितले आहे. पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी ट्विट करुन या महिला पोलिसाचं कौतुक केलं आहे. जीवाची पर्वा न करता म.स.पो.नि अनिता कदम आणि पीसी चव्हाण अक्सा बिचवर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या 23 वर्षीय मुलीचा जीव वाचवला. त्यांची कामाप्रती निष्ठा आणि धाडस कौतुकास्पद असल्याची भावना आयुक्तांनी व्यक्त केली आहे.

जिवाची पर्वा न करता महिला पोलीस अनिता यांनी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीला मदतीचा हात दिली. महिला पोलिसांच्या प्रसंगावधानाने या तरुणीचा जीव वाचला.

First published:

Tags: Mumbai police