मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, देवेंद्र फडणवीस-चंद्रकांत पाटलांच्या सुरक्षेत केली कपात

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, देवेंद्र फडणवीस-चंद्रकांत पाटलांच्या सुरक्षेत केली कपात

राज्यातील नेत्यांना देण्यात येणाऱ्या सुरक्षेचा वारंवार आढावा घेतला जात असतो. त्यानुसार काही निर्णय घेतले जात असतात.

राज्यातील नेत्यांना देण्यात येणाऱ्या सुरक्षेचा वारंवार आढावा घेतला जात असतो. त्यानुसार काही निर्णय घेतले जात असतात.

राज्यातील नेत्यांना देण्यात येणाऱ्या सुरक्षेचा वारंवार आढावा घेतला जात असतो. त्यानुसार काही निर्णय घेतले जात असतात.

मुंबई, 10 जानेवारी : माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (devendra Fadanvis) यांच्या सुरक्षेत मोठी कपात करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने (MVA Goverment) घेतला आहे. त्याच बरोबर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant patil), विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याही सुरक्षेतील वाहनं कमी करण्यात आली आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या महत्त्वाच्या बैठकीमध्ये विरोधी पक्षातील नेत्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा ताफ्यात देण्यात आलेली बुलेटप्रुफ गाडी काढण्यात येणार आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रविण दरेकर, प्रसाद लाड, यांच्याही सुरक्षा व्यवस्थेत मोठी कपात करण्यात आली आहे.

दिया मिर्जाच्या एक्स मॅनेजरला NCB कडून अटक; 200 किलोग्रॅम गांजा जप्त

महाविकास आघाडी सरकारने विरोधी पक्षातील नेत्यांची सुरक्षा कपात केली नसून काँग्रेसचे नेते आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, संजय बनसोडे यांच्या सुरक्षेत देखील कपात केली आहे. त्याचबरोबर काँग्रेसचे माजी मुंबई शहर अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांच्या सुद्धा सुरक्षा काढून घेण्यात आली आहे.

राज्यातील नेत्यांना देण्यात येणाऱ्या सुरक्षेचा वारंवार आढावा घेतला जात असतो. त्यानुसार पुढील काही निर्णय घेतले जात असतात. याबद्दल दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. त्यानंतर सुरक्षेमध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयाचा भाजपने विरोध केला आहे.

'सर्व नेते महाराष्ट्रात फिरून जनतेच्या भावभावना जाणत असतात. कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  हे घरात बसलेले असताना सर्वाधिक देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात फिरले व जनतेला दिलासा दिला. काल ही भंडारा येथे तेच पोहचले. या नेत्यांच्या सुरक्षितता कपात करण हे निव्वळ सुडबुद्धीच राजकारण आहे, अशी टीका भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.

First published:
top videos

    Tags: Devendra Fadnavis