मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबई पोलिसांवर बोट ठेवणाऱ्या अमृता फडणवीस यांच्या सुरक्षेत कपात, ठाकरे सरकारचा मास्टरस्ट्रोक!

मुंबई पोलिसांवर बोट ठेवणाऱ्या अमृता फडणवीस यांच्या सुरक्षेत कपात, ठाकरे सरकारचा मास्टरस्ट्रोक!

'सुशांत सिंह राजपूत प्रकरणात अमृता फडणवीस यांनी मुंबई पोलिसांवरच संशय व्यक्त केला होता. 'सुशांत प्रकरणामुळे मुंबई शहर आता सुरक्षित राहिले नाही'

'सुशांत सिंह राजपूत प्रकरणात अमृता फडणवीस यांनी मुंबई पोलिसांवरच संशय व्यक्त केला होता. 'सुशांत प्रकरणामुळे मुंबई शहर आता सुरक्षित राहिले नाही'

'सुशांत सिंह राजपूत प्रकरणात अमृता फडणवीस यांनी मुंबई पोलिसांवरच संशय व्यक्त केला होता. 'सुशांत प्रकरणामुळे मुंबई शहर आता सुरक्षित राहिले नाही'

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 10 जानेवारी : बॉलिवूड अभिनेते सुशांत सिंह राजपूत आत्महत्या (sushant singh rajput case) प्रकरणावरुन मुंबई पोलिसांवरच संशय व्यक्त करणाऱ्या भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांना ठाकरे सरकारने (MVA Goverment) झटका दिला आहे. अमृता फडणवीस यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे.

ठाकरे सरकारने दोन दिवसांपूर्वी महत्त्वाची बैठक घेऊन माजी मंत्री आणि विरोधी पक्षातील नेत्यांच्या सुरक्षेबद्दल आढावा घेतला होता. त्यानंतर विरोधी पक्षातील नेते आणि त्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे.

SBI ची कोट्यवधी ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; FD व्याज दरात वाढ

देवेंद्र फडणवीस यांच्या संपूर्ण कुटुंबाला सुरक्षा पुरवण्यात आली होती. देवेंद्र फडणवीस यांना झेड प्लस सुरक्षा होती. आता त्यात कपात करून वाय प्लस एस्कॉर्टसह सुरक्षा देण्यात आली आहे. त्यांच्या ताफ्यातील बुलेटप्रुफ गाडीही काढून घेण्यात आली आहे. तर अमृता फडणवीस त्यांची मुलगी दिवीजा यांना वाय प्लस एस्कॉर्टसह सुरक्षा पुरवण्यात आली होती. यात कपात करण्यात आली असून फक्त एक्स ही सुरक्षा राहणार आहे.

विशेष म्हणजे, सुशांत सिंह राजपूत प्रकरणात अमृता फडणवीस यांनी मुंबई पोलिसांवरच संशय व्यक्त केला होता. 'सुशांत प्रकरणामुळे मुंबई शहर आता सुरक्षित राहिले नाही. इथं निष्पाप लोकांच्या बाबतीत माणुसकी दाखवली जात नाही.  मुंबईत आता स्वाभिमानी आणि साध्या लोकांचं जगणं सुरक्षित नाही' असं ट्वीट अमृता फडणवीस यांनी केले होते. त्यानंतर बराच वाद झाला होता. शिवसेनेच्या नेत्यांनी अमृता फडणवीस यांना मुंबई पोलिसांची सुरक्षा न घेण्याचा सल्लाच दिला होता.

धक्कादायक! आई रागावली म्हणून 17 वर्षीय मुलीनं थेट उचललं हे पाऊल

त्यानंतर आता ठाकरे सरकारने फडणवीस कुटुंबातील सदस्यांच्या सुरक्षेत मोठी कपात केली आहे.  देवेंद्र फडणवीस यांच्यासह   भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रविण दरेकर, प्रसाद लाड, यांच्याही सुरक्षा व्यवस्थेत मोठी कपात करण्यात आली आहे.  तर प्रवीण दरेकर यांना वाय सुरक्षा दिली आहे, ती आधी वाय प्लस सुरक्षा होती. तसंच नारायण राणे यांचीही सुरक्षा कमी करण्यात आली आहे.

First published: