अमित शहांना लाल दिव्याचा मोह काही केल्या सुटेना!

अमित शहांना लाल दिव्याचा मोह काही केल्या सुटेना!

  • Share this:

22 एप्रिल : केंद्र सरकारने लाल दिवा हटवण्याचा निर्णय घेतल्यापासून पार अगदी पंतप्रधानांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळ्याच व्हीव्हीआयपींनी स्वतःहूनच आपल्या गाडीवरचे लालदिवे काढून टाकले आहेत. पण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांना मात्र, अजूनही लाल दिव्याच्या मोह सुटत नाहीये. कालच्या ठाण्याच्या कार्यक्रमातही अमित शहांच्या गाडीवरचा लालदिवा ठळकपणे सगळ्याच्याच नजरेत भरत होता.

व्हीआयपी कल्चरचं प्रतिक असलेला लालदिवा खरंतर येत्या 1 मेपासून सगळ्यांच्या गाडीवरून हटणार आहे. पण पंतप्रधान ते मुख्यमंत्री अशा सगळ्याच व्हीव्हीआयपींनी नैतिकता म्हणून आत्तापासूनच लालदिवा सोडला आहे. पण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या अमित शहांना मात्र, काही केल्या लालदिव्याचा मोह सुटत नाहीये.

ठाण्यात काल लालदिव्याच्या गाडीतूनच ते सावरकर साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला आले होते. खरंतर अमित शहा कोणत्याही खात्याचे मंत्री नाहीत, तरीही त्यांच्या गाडीला लाल दिवा आहे. कारण त्यांना पुरवली जाणारी झेडप्लस सुरक्षा. या झेडप्लस सुरक्षेचा भाग म्हणूनच त्यांच्या दिमतीला मोठा फौजफाटा असतो. सुरक्षेच्या कारणाचं एकवेळ समजू शकतो पण लालदिव्याचा हव्यास नेमका कशासाठी ? तसाही 1 मेपासून म्हणजेच 8 दिवसांनी अमित शहांच्या गाडीवरचा लालदिवाही हटणारच आहे की, मग तरीही देशातलं दुसऱ्या क्रमांकाचं सत्ताकेंद्र असलेल्या अमित शहांनी लाल दिव्याचा एवढा सोस ठेवणं नैतिकतेला धरून आहे का अशी चर्चा सोशल मीडियावरही आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 22, 2017 02:55 PM IST

ताज्या बातम्या