Home /News /mumbai /

मोठी संधी! SBI आणि भारतीय डाक विभागामध्ये भरती प्रक्रिया सुरू, असा करा अर्ज

मोठी संधी! SBI आणि भारतीय डाक विभागामध्ये भरती प्रक्रिया सुरू, असा करा अर्ज

बेरोजगार तरुणांसाठी एक दिलासादायक बातमी आली असून SBI आणि भारतीय डाक विभागामध्ये भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.

  मुंबई, 22 नोव्हेंबर : कोरोना काळात लॉकडाऊनची अंमलबजावणी आणि उत्पादनांच्या मागणीमध्ये झालेली घट यामुळे अनेक ठिकाणी तरुणांच्या नोकऱ्या गेल्या. तसंच नवीन नोकरी मिळवतानाही अडचणी निर्माण होत आहेत. अशा बेरोजगार तरुणांसाठी एक दिलासादायक बातमी आली असून SBI आणि भारतीय डाक विभागामध्ये भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. SBI मध्ये 2000 पदांसाठी भरती पदाचे नाव: प्रोबेशनरी अधिकारी (PO) शैक्षणिक पात्रता : पदवीधर वयोमर्यादा : 1 एप्रिल 2020 रोजी 21 ते 30 वर्षे (मागासवर्गीय प्रवर्गातील उमदेवारांना सवलत) आवेदनाची अंतिम तारीख : 4 डिसेंबर 2020 भारतीय डाक विभागमध्ये विविध पदाच्या 12 जागा पदाचे नाव :- मोटार व्हेईकल मेकॅनिक (5 जागा) पात्रता : जड वाहनाचा परवाना (लायन्सस) पदाचे नाव :- टिनस्मिथ (3 जागा) शैक्षणिक पात्रता : 8 वी उत्तीर्ण आणि संबंधित पदाचा 1 वर्षाचा अनुभव किंवा शासनमान्य टेक्निकल इन्स्टिट्यूटचे सर्टीफिकेट पदाचे नाव :- पेंटर (2 जागा) शैक्षणिक पात्रता : 8 वी उत्तीर्ण आणि संबंधित पदाचा 1 वर्षाचा अनुभव किंवा शासनमान्य टेक्निकल इन्स्टिट्यूटचे सर्टीफिकेट पदाचे नाव :- टायरमन (1 जागा) शैक्षणिक पात्रता : 8 वी उत्तीर्ण आणि संबंधित पदाचा 1 वर्षाचा अनुभव किंवा शासनमान्य टेक्निकल इन्स्टिट्यूटचे सर्टीफिकेट पदाचे नाव :- ब्लॅकस्मिथ (1 जागा) शैक्षणिक पात्रता : 8 वी उत्तीर्ण आणि संबंधित पदाचा 1 वर्षाचा अनुभव किंवा शासनमान्य टेक्निकल इन्स्टिट्यूटचे सर्टीफिकेट वयोमर्यादा :- 30 वर्षे (मागासर्गीय उमेदवारांसाठी सवलत) आवेदन पाठविण्याचा पत्ता :- THE SENIOR MANAGER, MAIL MOTOR SERVICE, 134-1, SUDAM KALU AHIRE MARG, WORLI, MUMBAI-400018 आवेदनाची अंतिम तारीख :- 21 डिसेंबर 2020

  तुमच्या शहरातून (मुंबई)

  Published by:Akshay Shitole
  First published:

  Tags: Sbi bank job

  पुढील बातम्या