मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

शिक्षकांसाठी आनंदाची बातमी! राज्यात 6 हजार शिक्षक भरतीला सरकारकडून हिरवा कंदील

शिक्षकांसाठी आनंदाची बातमी! राज्यात 6 हजार शिक्षक भरतीला सरकारकडून हिरवा कंदील

नववी ते बारावी च्या विद्यार्थ्यांना त्यांना आवश्यकता असेल त्यावेळी पालकांच्या लिखित पूर्वपरवानगीसह शाळेत यायला परवानगी.

नववी ते बारावी च्या विद्यार्थ्यांना त्यांना आवश्यकता असेल त्यावेळी पालकांच्या लिखित पूर्वपरवानगीसह शाळेत यायला परवानगी.

सरकारच्या या निर्णयामुळे भरतीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबई, 8 डिसेंबर : राज्यात 6 हजार शिक्षक भरतीला मान्यता देण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे भरतीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पवित्र पोर्टल पद्धतीने ही भरती होणार आहे. गेल्या 2 वर्षांपासून ही शिक्षक भरती विविध कारणांमुळे थांबली होती. ही भरती लवकरात लवकर घ्यावी, अशी मागणी राज्यभरातील शिक्षकांकडून करण्यात येत होती. यासाठी राजधानी मुंबईतही आंदोलने झाली. गुरुजींच्या या संघर्षाला आता अखेर यश आलं असून राज्यात लवकरच 6 हजार शिक्षकांची भरती होणार आहे. राज्य सरकारकडून आणखी कुठे उपलब्ध होणार नोकऱ्या? एकीकडे शिक्षक भरतीबाबत सरकारने निर्णय घेतला असतानाच राज्याच्या कौशल्य विकास विभागामार्फत ऑनलाईन रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून 80 हजार युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. कशी असेल प्रक्रिया? दिनांक 7 ते 12 डिसेंबर 2020 पर्यंत rojgar.mahaswayam.gov.in आणि yodhaat80.org या दोन संकेतस्थळावर नोकरी देणारे आणि नोकरी हवी असणारे लोक नोंदणी करू शकतात. त्यानंतर 12 आणि 13 डिसेंबर 2020 रोजी ऑनलाइन मुलाखतीच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी दिल्या जातील, असं नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. 7 डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी 214 कंपन्यांनी उपक्रमामध्ये नोंदणी केली आहे. 80 हजार तरुणांना रोजगार दिला जाईलच. पण हा आकडा आणखी जास्त वाढण्याची शक्यता आहे. कारण, कंपन्यांची मागणी अधिक असल्यामुळे हा आकडा एक लाखाच्यावरही जाऊ शकतो, असंही मलिक यांनी सांगितले.
First published:

Tags: Uddhav Thackeray (Politician)

पुढील बातम्या