महाराष्ट्र कोरोनाला हरवणारच! पहिल्यांदाच दिलासा देणारे 2 आकडे आले समोर

महाराष्ट्र कोरोनाला हरवणारच! पहिल्यांदाच दिलासा देणारे 2 आकडे आले समोर

मार्चच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील पहिले रुग्ण आढळल्यानंतर 31 मार्च अखेर राज्यात 302 रुग्ण होते.

  • Share this:

मुंबई, 1 जून : राज्यामध्ये कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मार्चच्या तुलनेत मे महिन्यात सुमारे साडेतीन पटीने वाढून 43.35 टक्के एवढे झाले आहे. गेल्या तीन महिन्यांची आकडेवारी पाहता मे मध्ये सर्वाधिक रुग्ण बरे झालेले दिसून येत आहेत. यासोबतच राज्यातील रुग्ण दुपटीचा कालावधी (डबलींग रेट) 11वरून 17.5 दिवसांवर गेला आहे.

मार्चच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील पहिले रुग्ण आढळल्यानंतर 31 मार्च अखेर राज्यात 302 रुग्ण होते. त्यातील 39 रुग्ण बरे झाले. म्हणजे मार्च महिन्यात कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 12.91 टक्के एवढे होते. एप्रिल अखेर राज्यात 10 हजार 498 रुग्ण होते. त्यातील 1773 रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. एप्रिल महिन्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 16.88 टक्के होते.

महाराष्ट्रात 31 मे अखेर 67 हजार 655 रुग्णांपैकी 29 हजार 329 रुग्ण बरे होऊन घरी गेले त्यामुळे मे अखेरीस राज्याचा रिकव्हरी रेट मार्चच्या तुलनेत सुमारे साडे तीन पटीने वाढत 43.35 टक्के एवढा झाला आहे. राज्य शासनाने हाती घेतलेल्या उपाययोजना, लागू केलेले लॉकडाऊन, डॉक्टर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या परिश्रमांमुळे त्यासोबतच केंद्र शासनाने सुधारीत डिस्चार्ज पॉलिसी जाहीर केल्यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.

हेही वाचा - मुंबईतील कोरोना रुग्णावर परस्पर अंत्यसंस्कार का केले? अखेर पालिकेने केला खुलासा

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तर एकाच दिवशी 8000 रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचा विक्रम नोंदवला गेला, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. राज्याचा रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आणि रुग्ण दुपटीचा कालावधी वाढविण्यासाठी अधिक प्रयत्न करण्यात येत असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

First published: June 1, 2020, 7:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading