मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

बाळासाहेबांचा फोटो लावून सेनेकडून वसुली, पुराव्यासह संदीप देशपांडेंचा घणाघाती आरोप

बाळासाहेबांचा फोटो लावून सेनेकडून वसुली, पुराव्यासह संदीप देशपांडेंचा घणाघाती आरोप

'विरप्पने देशाला जेवढं लुटलं नसेल तितकं मुंबई महापालिकेला सत्ताधाऱ्यांनी लुटले आहे.'

'विरप्पने देशाला जेवढं लुटलं नसेल तितकं मुंबई महापालिकेला सत्ताधाऱ्यांनी लुटले आहे.'

'विरप्पने देशाला जेवढं लुटलं नसेल तितकं मुंबई महापालिकेला सत्ताधाऱ्यांनी लुटले आहे.'

मुंबई, 04 फेब्रुवारी : शिवसेनेकडून (Shivsena) मुंबईत (Mumbai) कोट्यवधी रुपयांची खंडणी गोळा केली जात आहे, असा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर केला आहे. याबद्दल पुरावे सुद्धा संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

'विरप्पने देशाला जेवढं लुटलं नसेल तितकं मुंबई महापालिकेला सत्ताधाऱ्यांनी लुटले आहे. महानगरपालिकेने हॉकर्स झोन सुरू करायचं ठरवलं, रस्त्यावरच्या फेरीवाल्यांकडून खंडणी वसुल करायचं काम सेना करत आहे, कन्नमवार नगर, विक्रोळी येथील शिवसेनेच्या 118 क्रमांकाच्या शाखेकडून सार्वजनिक रस्त्यावर फेरीवाल्यांकडून होत असलेल्या कचरा स्वच्छ करण्यासाठी निधी गोळा केला जात आहे, तो बेकायदेशीर आहे, असा आरोप संदीप देशपांडे यांनी केला.

'KGF 2 च्या प्रदर्शनाच्या दिवशी राष्ट्रीय सुट्टी जाहीर करा', PM ना लिहिलं पत्र

शिवसेनेनं कोट्यवधी रुपयांचा निधी खंडणीरुपी वसूल करत असल्याचा आरोप देशपांडे यांनी केला आहे आणि त्याचा पुरावा म्हणून शिवसेना शाखेकडून पैसे वसूल करत असल्याच्या पावत्या सुद्धा दाखवल्या आहे.

शिवसेनेच्या शाखेकडून 10 रुपये वसूल केले जात आहेत. यात  नगरसेवकांचा फोटो आहे पण बाळासाहेबांचा फोटोही आहे. शिवसेनेला बाळासाहेबांचा फोटो अशाप्रकारे खंडणी वसूल करण्यासाठी  वापरण्याचा कोणताही अधिकार नाही.  मुख्यमंत्र्यांना यातला कट(भाग) पोहोचतोय का? असा सवालही देशपांडे यांनी विचारला.

फोटोशॉप वापरून घेतलं बेरोजगारांच्या नावानं लोन, EMI देण्याची वेळ आली तेव्हा...

संबंधितांवर कडक कारवाई झाली पाहिजे. महापालिका अधिकारी किंवा पोलीस याला पाठिंबा देत असतील तर त्याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणीही देशपांडे यांनी केली.

First published: