• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • मुंबईत मंगळवारी 12 वर्षातील रेकॉर्डब्रेक पाऊस कोसळला!

मुंबईत मंगळवारी 12 वर्षातील रेकॉर्डब्रेक पाऊस कोसळला!

मुंबईत काल दिवसभरात तब्बल 238 मिमि पावसाची नोंद झालीय. गेल्या 12 वर्षातला हा रेकॉर्डब्रेक पाऊस आहे. सकाळी साडेआठ ते रात्री साडेआठ या बारा तासांमध्ये पडलेल्या मुसळधार पावसाची सांताक्रझ वेधशाळेत ३१५.८ मिमी तर कुलाबा वेधशाळेत १०१.८ मिमी इतकी नोंद झालीय.

  • Share this:
मुंबई, 30 ऑगस्ट : मुंबईत काल दिवसभरात तब्बल 238 मिमि पावसाची नोंद झालीय. गेल्या 12 वर्षातला हा रेकॉर्डब्रेक पाऊस आहे. सकाळी साडेआठ ते रात्री साडेआठ या बारा तासांमध्ये पडलेल्या मुसळधार पावसाची सांताक्रझ वेधशाळेत ३१५.८ मिमी तर कुलाबा वेधशाळेत १०१.८ मिमी इतकी नोंद झालीय. सर्वसाधारणपणे 24 तासात 65 मिमिच्या पुढे पाऊस पडला तर हवामान खात्याकडून त्याची गणना मुसळधार पावसात केली जाते. काल मात्र, अवघ्या तीन तासातच तब्बल 86 मिमि पावसाची नोंद झाली. मंगळवारी संध्याकाळी अवघ्या 9 तासांमध्ये 300 मिमि पाऊस पडल्याने या पावसाची तुलना साहजिकच 26 जुलैच्या जलप्रलयाशी होऊ लागलीय. मात्र ही ढगफुटी नसल्याचे मुंबई हवामानशास्त्र विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. यावेळी ढगांची उंची २६ जुलैएवढी नव्हती. कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढली असल्याने कोकण किनारपट्टीवर पाऊस पडत आहे. बुधवारीही ही स्थिती कायम राहील, असे सांगण्यात आले. अरबी समुद्रात सक्रिय झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सकाळी आठच्यानंतर जोरदार पावसाचा सुरुवात झाली. सकाळी आठ ते सायंकाळी साडेपाच या वेळेत सांताक्रूझ वेधशाळेने २९७ मिमी तर कुलाबा वेधशाळेने ६५ मिमी पावसाची नोंद केली. सांताक्रूझ येथे दुपारी अडीच वाजेपर्यंत १२६ मिमी पावसाची नोंद झाली होती तर पुढील तासात १७१ मिमी पावसाची नोंद झाली. यंदाच्या मान्सूनमधील मंगळवारी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.
First published: