Home /News /mumbai /

महाराष्ट्रातील सर्व शाळा आणि महाविद्यालय बंद, निवडणुका 3 महिने पुढे ढकलण्याची शिफारस

महाराष्ट्रातील सर्व शाळा आणि महाविद्यालय बंद, निवडणुका 3 महिने पुढे ढकलण्याची शिफारस

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोरोना व्हायरसबद्दल आढावा बैठक घेऊन पत्रकार परिषद घेतली.

    मुंबई, 16 मार्च : जगभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार उडाला आहे. महाराष्ट्रातही कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या 38 वर पोहोचली आहे. आता खबरदारी म्हणून राज्यातील सर्व शाळा बंद करण्यात आल्या आहे, अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. तसंच, महापालिका आणि ग्रामपंचायत निवडणुका 3 महिने पुढे ढकलण्याचा निर्णय झाला असून तशी शिफारस निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोरोना व्हायरसबद्दल आढावा बैठक घेऊन पत्रकार परिषद घेतली. आपल्याकडे कोरोना व्हायरसची पातळी ही दुसऱ्या स्तरावर पोहोचली आहे. राज्यात अजून कोरोनामुळे तिसऱ्या स्तरावरची परिस्थिती पोहोचली नाही, अशी महत्त्वाची माहिती टोपे यांनी दिली. तसंच,  राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि राज्यातील सर्व विद्यापीठ परीक्षा 31 मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात येणार आहे.  उद्यापासून राज्यातील सर्व विद्यापीठ महाविद्यालय, इंजिनिअर यासह वेगवेगळ्या परीक्षा 31 मार्चपर्यंत असतील त्यांचे पेपर पुढे ढकलण्यात येणार आहे. ज्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहे त्या एप्रिल महिन्यात घेण्यात येतील,  पुढील सुचना येईपर्यंत बंद राहणार आहे, असं टोपे यांनी सांगितलं. राज्यात आगामी काळात महापालिका आणि ग्रामपंचायती निवडणुका येऊ घातल्या आहे.  कोरोना व्हायरसची परिस्थितीत पाहत निवडणुका 3 महिने पुढे ढकलण्यात यावा असा निर्णय राज्य सरकारचा झाला आहे. याबद्दल निवडणूक आयोगाला तशी विनंती करण्यात आली आहे, अशी माहितीही टोपे यांनी दिली. राजेश टोपे यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे - दहावी आणि बारावीच्या परिक्षा सुरुच राहणार - मुंबई बाग आंदोलकांची नोंद घेण्यात आली आहे त्यांना काऊन्सेलिंग करण्याची व्यवस्था करत आहोत - जनहितार्थ आवश्यक ते निर्णय घेण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं आहे - जिथे जिथे लोक गर्दी करत आहेत तिथे जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत - मंत्रालयात आता सामान्यांना प्रवेश नाही -होम क्वारंटाईन 31 मार्चपर्यंत त्यांना हातावर शिक्के मारले जाणार - दुबई , सौदी अरेबिया आणि अमेरिका येथून येणाऱ्या प्रवाशांनी एबीसीमध्ये आयसोलेशन केलं जाणार - सर्व निवडणुका 3 महिना पुढे ढकलण्यात याव्या अशा निवडणूक आयोगाला सूचना - सर्व शाळा , कॉलेज आणि विद्यापीठांना परिक्षा पुढे ढकलण्याच्या सूचना - प्रत्येक आयुक्तालयाला 15 कोटी आणि छोट्या आयुक्तालयांना 5 कोटी उपलब्ध करुन दिलेत राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 38 वर दरम्यान, राज्यात कोरोनाचा धोका वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार आणखीन 4 रुग्ण पॉझिटिव्ह झाल्याची माहिती मिळत आहे. आता राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 38 वर गेली आहे. मुंबईमध्ये तीन आणि नवी मुंबईत एक रुग्ण आढल्याची माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे. कोरोनाचा वाढत्या संसर्ग लक्षात घेता शाळा, महाविद्यालयं, चित्रपट गृह बंद ठेवण्यात आली आहेत. पुण्यापाठोबात आता मुंबईमध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग पाहायला मिळत असल्यानं मुंबईकरांना सावधानतेचा इशाराही देण्यात आला आहे. गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. पुणे - 16 नागपूर - 4 यवतमाळ - 2 ठाणे - 1 अहमदनगर - 1 कल्याण 1 पनवेल - 1 नवी मुंबई - 1 मुंबई - 8 नवी मुंबई- 1 औरंगाबाद - 1
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या