'आमच्या फाशीची शिफारस करा', लखनभैय्या एन्काऊंटर प्रकरणातील निलंबित पोलिसाचे पत्र

'आमच्या फाशीची शिफारस करा', लखनभैय्या एन्काऊंटर प्रकरणातील निलंबित पोलिसाचे पत्र

२०१३ पासून हे प्रकरण मुंबई हायकोर्टात प्रलंबित असल्याने उद्विग्न होऊन देसाई यांनी हे पत्र लिहिलं आहे.

  • Share this:

मुंबई, 23 फेब्रुवारी : २००६ साली झालेल्या लखनभैय्या एन्काऊंटर प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या निलंबित पोलीस शिपाई तानाजी देसाई यांनी “आम्हाला या प्रकरणात फाशीची देण्याची शासनास शिफारस करण्यात यावी” असं पत्र मुंबई पोलीस आयुक्तांना लिहिलं आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे.

२०१३ पासून हे प्रकरण मुंबई हायकोर्टात प्रलंबित असल्याने उद्विग्न होऊन देसाई यांनी हे पत्र लिहिलं आहे. देसाई ७ जानेवारी २०१० पासून या प्रकरणात जेलमध्ये आहेत. आपल्याला या प्रकरणात आता जेलमध्ये १० वर्ष जेलमध्ये काढावी लागली असून आम्ही हे एन्काऊंटर वैयक्तिक स्वार्थापोटी केलं होतं का ? आम्ही यंत्रणेचे बळी ठरलो आहोत का ? असा सवाल माझ्यासह माझ्या कुटुंबीयांना पडत असतात असंही देसाई यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

सध्या देसाई हे पुण्यातील येरवडा कारागृहात आहेत. २०१३ साली त्यांना सेशन्स कोर्टाने या प्रकरणी १३ पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या विरोधात त्यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलून ती प्रलंबित असल्याच्या उद्वेगातून देसाई यांनी हे पत्र लिहिलं आहे. २०१५ साली देवेंद्र फडणवीस सरकारनं सेशन्स कोर्टाच्या निर्णयाला ६ महिने स्थगिती दिली होती. मात्र, २१ डिसेंबर २०१५ रोजी मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.

छोटा राजन टोळीचा सदस्य असलेल्या रामनारायण गुप्ता उर्फ लखनभैय्याचा याचा ११ नोव्हेंबर २००६ रोजी कथित एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला होता.

First published: February 23, 2020, 11:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading