01 एप्रिल: मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाईन मूल्यांकनाचा घोळ अजूनही कायम आहे. आधी विद्यापीठाचे निकाल तब्बल सहा महिने उशिरा लागले तर आता 1200हून अधिक विद्यार्थ्यांचे पुनर्मूल्यांकनाचे निकाल रखडले आहेत.
गेल्यावर्षी ऑनलाईन मूल्याकंन पद्धतीने निकाल लावण्याचा प्रयोग मुंबई विद्यापीठाने केला. पण विद्यापीठाच्या ढिसाळ कारभारमुळे गोंधळ झाला आणि नेहमी जूनमध्ये लागणारे निकाल लागायला अखेर ऑक्टोबर नोव्हेंबर उजाडले. विशेष म्हणजे यावर्षी परीक्षा फी देखील जास्त घेतली गेली होती. निकाल तर लागले पण या निकालांमध्ये अनेक टॉपर विद्यार्थी चक्क नापास झाले तर अनेकांना अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले. त्यामुळे अशा मुलांनी पुन्हा पुनर्मूल्यांकनाचे फॉर्म भरले. पण सात महिने उलटून गेले तरी अजूनही पुनर्मूल्यांकनाचे निकाल लागलेले नाही. आता यावर्षीच्या परीक्षांच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या 1200हून अधिक विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहेत.
विद्यापीठांच्या निकालांवरून राजकारण खूप झाले पण आता या विद्यार्थ्यांचे निकाल कधी लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Education, Mumbai university, निकाल, भारत, महाराष्ट्र, मुंबई विद्यापीठ, राज्य महाराष्ट्र, शिक्षण