Home /News /mumbai /

'राष्ट्रवादी काँग्रसने शिवसेनाला संपवू नये यासाठी हे पाऊल; मी काल, आज, उद्या शिवसेनेतचं..!' बंडखोर आमदाराचं ट्विट

'राष्ट्रवादी काँग्रसने शिवसेनाला संपवू नये यासाठी हे पाऊल; मी काल, आज, उद्या शिवसेनेतचं..!' बंडखोर आमदाराचं ट्विट

आपल्या ट्विटमध्ये योगेश कदम यांनी लिहिलं, 'सप्रेम जय महाराष्ट्र. मी काल, आज, उद्या शिवसेनेतचं..!

    मुंबई 25 जून : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार सध्या संकटात आहे. महाविकास आघाडीच्या तीन चाकांपैकी एक चाक आता डगमगलं आहे. शिवसेनेच्या 38 आमदारांनी बंड पुकारलं असून ते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत गुवाहाटीमध्ये असल्याचा दावा शिंदे यांच्याकडून केला जात आहे. अनेक बंडखोर आमदारांनी आपल्या नाराजीची कारणंही सांगितली आहेत. अशात आता दापोली मंडणगडचे आमदार आणि रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 'XXला पाय लावून का पळाला, आता बकरी सारखे बेबे करू नका', संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना सुनावलं आपल्या ट्विटमध्ये योगेश कदम यांनी लिहिलं, 'सप्रेम जय महाराष्ट्र. मी काल, आज, उद्या शिवसेनेतचं..! भाजपामध्ये कुठल्याही परिस्थितीत प्रवेश करणार नाही.. मुळात तशी गरजही पडणार नाही.. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवसेना संपवू नये यासाठी उचललेलं हे पाऊल येणाऱ्या काळात शिवसेनेला अधिक भक्कम करेल. ही परिस्थिती मावळल्यावर दापोली मतदारसंघात शिवसेनेचा भगवाच हातात घेऊन येईल. संयम बाळगा, अफवांवर विश्वास ठेवू नका..मी शिवसैनिक! या ट्विटमधून योगेश कदम यांनी ते शिवसेनेची साथ सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मी शिवसेनेतच राहाणार आहे. फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीमुळे शिवसेना संपत असल्याने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे. शिवसनेने सत्तास्थापनेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने अनेक आमदारांमध्ये नाराजी होती, असंही बंडखोर आमदारांनी याआधीच स्पष्ट केलेलं आहे. गेले अडीच वर्ष हे सर्व आमदार शांत होते, मात्र अखेर त्यांच्या सहनशक्तीचा बांध फुटला, असं म्हणावं लागेल. दरम्यान पहाटे पाच वाजेपर्यंत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी चर्चेसाठी एक बैठक घेतली. यानंतर प्रत्येक बंडखोर आमदाराच्या खोलीत जाऊन शिंदे यांनी त्यांची भेट घेतली. 'कार्यकर्त्यांना सांगा, आम्ही शिवसेनेतच'; 4 तासाच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदेंच्या बंडखोर आमदारांना सूचना एकनाथ शिंदे यांच्यासह भरत गोगावले, दादा भुसे, गुलाबराव पाटील यांनीही सर्व आमदारांची एक एक करून भेटली घेतली. यावेळी सर्व आमदारांना आपल्या कुटुंबीयांसोबत बोलायला सांगितलं. तसंच सांगण्यात आलं की, 'कार्यकर्त्यांना सांगा आजही आम्ही शिवसेनेतच आहोत. बाळासाहेबांचे विचार सोडलेले नाहीत'. यासोबतच 'विधानसभा उपसभापतींना तो अधिकार नसल्याने आपल्यावर अपात्र कारवाई करता येणार नाही, असं आश्वासन सर्व आमदारांना देण्यात आलं.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Shivsena

    पुढील बातम्या