मुंबई, 2 जुलै : एकनाथ शिंदेच्या गटातील 50 आमदार तब्बल 11 दिवसांनंतर मुंबईत परतत आहेत. काही वेळापूर्वी ते मुंबई विमानतळावर उतरले आहेत. ते मुंबईत आल्यानंतर शिवसैनिक गोंधळ घालण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने सुरक्षा यंत्रणेला आधीच सावध करण्यात आलं आहे. हे बंडखोर आमदार मुंबईतील हॉटेल ताज प्रेसिडेंटमध्ये थांबणार असल्याची माहिती आहे. हॉटेलच्या जवळपासही मोठी सुरक्षा यंत्रणा लावण्यात आली आहे.
दरम्यान बंडखोर आमदार मुंबई विमानतळावर उतल्याचं वृत्त कळताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हॉटेल ताज प्रेसिडेंटकडे रवाना झाल्याचं समोर आलं आहे. बंडखोर आमदारांचं मुंबईत कसं स्वागत होईल, याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. सर्व आमदार हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर शिंदे गट आणि फडणवीसांचा बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे.
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यभरातील शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला होता. आज जळगावत माजी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह पाच शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केली आहे. त्यातच या बंडखोरांमुळे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. त्यामुळे जळगावात शिवसैनिक संतप्त झाले असून संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी भव्य आक्रोश मोर्चा काढला. याचे व्हिडीओही व्हायरल झाले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.