Home /News /mumbai /

फडणवीस खरंच नाराज? किरीट सोमय्यांनी सांगितलं उपमुख्यमंत्रीपद स्विकारण्यामागचं कारण

फडणवीस खरंच नाराज? किरीट सोमय्यांनी सांगितलं उपमुख्यमंत्रीपद स्विकारण्यामागचं कारण

उपमुख्यमंत्रीपद मिळाल्याने फडणवीस नाराज असल्याच्या चर्चांवरही त्यांनी उत्तर दिलं. सोमय्या म्हणाले, की पार्टी आणि महाराष्ट्र महत्त्वाचं आहे. त्यामुळे मान-अपमान बाजूला ठेवत फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं आहे.

    मुंबई 01 जुलै : 8 ते 10 दिवसांच्या हालचालींनंतर अखेर राज्याच्या राजकारणात गुरुवारी मोठी घडामोड घडली. राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर गुरुवारी एकनाथ शिंदे यांनी मुख्मंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली (New Government in Maharashtra). यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) १०५ आमदारांचा पाठिंबा असूनही मुख्यमंत्री न होता उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानं सगळेच विचारात पडले. यानंतर विविध राजकीय पक्षातील नेत्यांनीही यावर प्रश्न उपस्थित करत फडणवीसांवर अन्याय झाल्याचं म्हटलं. यावर आता किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) प्रतिक्रिया दिली आहे. 'आज पहिल्यांदा माझा चेहरा पडलेला कारण..' सत्तांतरानंतर उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदा साधला जनतेशी संवाद; मांडले हे 3 मुद्दे किरीट सोमय्या म्हणाले, की नवं सरकार येताच देवेंद्र फडणवीस यांनी पहिला निर्णय आरेचा घेतला. मेट्रो कारशेड आरेमध्येच होणार आहे. पर्यावरणाच्या नावाखाली ठाकरेंनी मेट्रोची अडीच वर्षे वाट लावली. आता मेट्रो पुन्हा रुळावर आणण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी करायला सुरुवात केली आहे, असंही ते म्हणाले. उपमुख्यमंत्रीपद मिळाल्याने फडणवीस नाराज असल्याच्या चर्चांवरही त्यांनी उत्तर दिलं. सोमय्या म्हणाले, की पार्टी आणि महाराष्ट्र महत्त्वाचं आहे. त्यामुळे मान-अपमान बाजूला ठेवत फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं आहे. ठाकरे आणि संजय राऊत यांनी दबाव आणि माफियागिरी केली आहे. ED अधिकाऱ्यांवर FIR दाखल करण्याचा त्यांचा डाव होता, तो कोर्टानं हाणून पाडला. संजय राऊतांनी भ्रष्टाचार केला, त्यांची चौकशी होणार आणि कारवाईही होणार, असंही ते म्हणाले. '..तर चंद्रकांत पाटीलही पर्याय होते, फडणवीसांवरच अन्याय का?' प्रकाश आंबेडकरांचा थेट केंद्राला सवाल फडणीसांवर अन्याय झाल्याचं राजकीय नेत्यांचं म्हणणं - प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar Tweet) यांनी फडवणीसांवर अन्याय झाल्याचं म्हणत त्यांना डिवचलं आहे. बिचारे देवेंद्र फडणवीस यांचा केंद्रातील नेतृत्वाने शंकरराव चव्हाण केला. चंद्रकांत पाटील हे अमित शाह यांच्या जवळचे आहेत. मागच्या सरकारमध्ये चंद्रकांत पाटील हे उपमुख्यमंत्र्यासारखेच वागले. एकनाथ शिंदे यांना नियंत्रणात ठेवायचं होतं तर ते चंद्रकांत पाटीलही करू शकले असते. देवेंद्र फडणवीसांचा बळी का? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्विटमधून केला आहे. याशिवाय शरद पवार, नाना पटोले, अमोल मिटकरी यांच्यासह इतरही अनेकांनी फडवणीसांना डिवचलं आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Devendra Fadnavis, Kirit Somaiya

    पुढील बातम्या