Home /News /mumbai /

लक्षात ठेवा सरकार हे.., फडणवीस-राऊतांच्या भेटीवर NCP नेत्याने दिला इशारा

लक्षात ठेवा सरकार हे.., फडणवीस-राऊतांच्या भेटीवर NCP नेत्याने दिला इशारा

'राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जितके चर्चेत राहत नाही, तितके संजय राऊत हे चर्चेत असता'

    मुंबई, 27 सप्टेंबर : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमुळे राज्याच्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. अखेर या भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसने प्रतिक्रिया देत महाविकास आघाडी सरकार हे एकटी शिवसेना चालवत नाही, अशी आठवण करून दिली आहे. 'संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीमुळे माध्यमांमध्ये चर्चा सुरू आहे. पण, ही त्यांची व्यक्तिगत किंवा सामाजिक भेट असेल. या भेटीचा महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही. कारण, शिवसेना ही काही एकटी सरकार चालवत नाही तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस त्यांच्यासोबत आहे', अशी आठवणच राष्ट्रवादीचे नेते माजीद मेमन यांनी शिवसेनेला करून दिली. तसंच, 'संजय राऊत यांना उद्धव ठाकरे यांनी असा कोणताही राजकीय अधिकार दिलेला नाही. मुळात शरद पवार हे महाविकास आघाडीमध्ये समन्यवाची भूमिका पार पाडत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला कोणताही धोका नाही, असंही  माजिद मेमन यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर, 'शिवसेनेचे खासदार  संजय राऊत हे कायम चर्चेत राहत असता. दररोज या ना त्या मुद्द्यावरून ते कायम बातम्यांमध्ये दिसत असतात. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जितके चर्चेत राहत नाही, तितके राऊत चर्चेत असतात', असा टोलाही मेमन यांनी लगावला. संजय राऊत यांनीही भेटीबद्दल केला खुलासा दरम्यान, त्याआधी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन फडणवीस यांच्यासोबत भेटीबद्दल खुलासा केला आहे. 'देवेंद्र फडणीस हे राज्याचे विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री आहे. त्यामुळे त्यांना भेटणे हे काही गुप्तपणे नाही. ही काही बंकरमध्ये भेट नव्हती. त्यांच्याशी बऱ्याच दिवसांपासून भेटण्याचा विचार होता. त्यांची जाहीरपणे मुलाखत घेण्याचा विचार होता. याआधीही शरद पवार यांचीही मुलाखत घेण्याचा विचार होता. पण कोरोनाच्या काळामुळे ती झाली नाही. आता फडणवीस यांची मुलाखत घेण्याचा विषय आला आहे.  महाराष्ट्रातील काही साहित्यिक संस्था आहे. त्यांनीही फडणवीस यांची प्रकट मुलाखत घ्यावी असा आग्रह केला आहे, असंही राऊत यांनी सांगितलं. वयाच्या 26व्या वर्षी हृदय विकाराचा धक्का; तुम्हालाही आहे का 'ही' सवय 'राज्य सरकारचा व्यवस्थिती कारभार सुरू आहे. पाच वर्ष हे सरकार चालणार आहे. शरद पवार यांचे उत्तम मार्गदर्शन मिळत आहे. उद्धव ठाकरे हे सरकारचे नेतृत्त्व करत आहे, त्यामुळे या भेटीतून कोणतेही समिकरण तयार होणार नाही', असंही राऊतांनी स्पष्ट केले. 'भाजप-शिवसेना पुन्हा एकत्र येणार नाही. चर्चा करायची असले तर ती होऊ शकते. आपल्याकडे चर्चेला काही सेन्सारशिप नाही. पण चर्चेला रेशनिंग सुद्धा नाही, असंही राऊतांनी सांगितलं.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Sanjay raut

    पुढील बातम्या