मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

BIG NEWS: RBIचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना कोरोनाची लागण

BIG NEWS: RBIचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना कोरोनाची लागण

कामकाज नियमित सुरूच राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. बँकेचं कुठलंही काम अडणार नाही. त्याची सगळी व्यवस्था करण्यात आली आहे.

कामकाज नियमित सुरूच राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. बँकेचं कुठलंही काम अडणार नाही. त्याची सगळी व्यवस्था करण्यात आली आहे.

कामकाज नियमित सुरूच राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. बँकेचं कुठलंही काम अडणार नाही. त्याची सगळी व्यवस्था करण्यात आली आहे.

  • Published by:  Ajay Kautikwar
मुंबई 25 ऑक्टोबर: RBIचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना कोरोनाची लागण झाली आहे. दास यांनीच ट्विट करून याची माहिती दिली आहे. कोरोनाची लक्षणे नाहीत, प्रकृतीही चांगली आहे, सध्या मी क्वारंटाइन झालो आहे अशी माहितीही त्यांनी दिली. जे कुणी माझ्या संपर्कात आले आहेत त्या सगळ्यांनी आपली टेस्ट करून घ्यावी असंही त्यांनी सांगितलं.  बँकेचं कामकाज नियमित सुरूच राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. बँकेचं कुठलंही काम अडणार नाही त्याची सगळी व्यवस्था करण्यात आली आहे. मी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कायम संपर्कात आहे आणि राहिन असंही त्यांनी सांगितलं. गेल्या काही दिवसांपासून दास हे सतत बैठकांमध्ये व्यस्त होते. कोरोनाचं संकटामुळे अर्थव्यवस्थेला तडाखा बसल्यामुळे आरबीआयवर सध्या कामाचा प्रचंड ताण आहे. राज्यात आणि देशात काय आहे कोरोनाची स्थिती? राज्यात कोरोना रुग्णांचा घसरलेला आलेख अजुनही कायम आहे. रविवारी राज्यात 5,648 जण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे कोरोनावर मात करणाऱ्या एकूण रुग्णांची संख्या ही 14,60,755 झाली आहे. तर राज्यात आज 6,059 नवे रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 16 लाख 45 हजारांवर गेली आहे. राज्याचा Recovery rate 88.8वर गेला आहे. तर 112 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. राज्याचा मृत्यू दर हा 2.63 एवढा झाला आहे. भारतात सलग तिसऱ्या दिवशी कोरोना (Coronavirus) रुग्णांची संख्या 55 हजारांपेक्षा कमी आढळली आहे. तर मृत्यू संख्या 500 ते 600च्या दरम्यान असल्याने देशातला कोरोनाचा आलेख घसरणील लागल्याचा अंदाज व्यकत होतो आहे. शनिवारी देशात 50,129 नवे रुग्ण आढळले. त्यामुळे देशातल्या एकूण रुग्णांची संख्या ही 78,64,811 झाली असून मृत्यूचा आकडा हा 1,18,534 एवढा झालाय. देशात सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ही 7 लाखांपेक्षा कमी आहे. सलग तिसऱ्या दिवशी अशीच परिस्थिती राहिल्याने देशाचा रिकव्हरी रेट हा 90 टक्के झाला आहे. देशात सध्या 6,68,154  रुग्णांवर उपचार सुरू आहे. एकूण रुग्णसंख्येत त्याचं प्रमाण हे 8.50 टक्के एवढं आहे. देशात 70,78,123 जण कोरोनामुक्त झाले आहेत. देशातला कोरोनामुक्तीचा दर 90 टक्के असून मृत्यचं प्रमाण हे 1.51 एवढं झालं आहे.
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या