विनया देशपांडे, मुंबई 12 ऑगस्ट: कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात प्रार्थना स्थळं अजुही बंदच आहेत. त्यांना सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या रझा अकादमीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मशिदींमध्ये नमाजासाठी परवानगी देण्याची मागणी केलीय. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून ही परवानगी द्यावी असंही रझा अकादमीने आपल्या पत्रात म्हटलं आहे. त्यासाठी अकादमीने हायकोर्टाच्या एका निकालाचा हवालाही दिला आहे. (Raza academy wants mosques to be opened )
जैन धर्मियांच्या पर्युषण पर्वानिमित्त हायकोर्टाने मंदिर सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्याचा हवाला देत रझा अकादमीने हे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे. पवित्र रमजान महिना आणि इथ होऊन आता काही महिने झाले आहेत. दररोजची प्रार्थना आणि शुक्रवारची खास प्रार्थना यापासून आम्ही वंचित आहोत.
लग्न समारंभाला माणसं जमू शकतात, अंत्यसंस्काराला जाऊ शकतात तर मग मशिदी बंद ठेवण्यात काय अर्थ आहे असा सवालही रझा अकादमीने आपल्या पत्रात केला आहे. सर्व निमांचं पालन करून मशिदी पुन्हा सुरु करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणीही त्यांनी केलीय.
'SADAK 2' रस्त्यावर; ट्रेलर रिलीज होताच काही तासांतच लाखो डिसलाइक्स
15 ऑगस्टपासून ही परवानगी द्यावी असंही रझा अकादमीने आपल्या पत्रात म्हटलं आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशात एका दिवसात 60 हजारहून अधिक रुग्ण सापडत आहे. गेल्या 24 तासातही 60 हजार 963 रुग्ण सापडले. तर, आतापर्यंत 704 जणांचा मृत्यू झाला. यासह देशातील एकूण रुग्णांची संख्या आता 23 लाख 29 हजार 639 झाली आहे.
इतक्या मोठ्या धक्क्यानंतरही अंकिता लोखंडे आणि विक्की जैनचं नातं आहे खास
आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशातील एकूण रुग्णांची संख्या आता 23 लाख पार झाली आहे. यात 6 लाख 43 हजार 948 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, आतापर्यंत 46 हजार 91 रुग्णांचा मृत्यू झाला. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 16 लाख 39 हजार 599 रुग्ण निरोगीही झाले आहे. यासह भारताचा रिकव्हरी रेट 70% झाला आहे.